सामाजिक

पर्यटनासाठी आलेल्या बाप लेकीचा पाण्यात बुडून मृत्यू

Spread the love

भोर / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

         पावसाळ्याच्या दिवसात निसर्ग सौंदर्य बहरत असल्याने अनेक लोक सहलीसाठी धबधबा ,धरण , असलेल्या पर्यटनस्थळी जातात. नोकरीवर असलेले चाकरमाने विरंगुळा म्हणून फ्रेश होण्यासाठी निसर्गरम्य ठिकाणी जाणे पसंद करतात.15 ऑगस्ट च्या दरम्यान सलग सुट्या आल्याने फारलक आणि धर्माधिकारी कुटुंब या ठिकाणी आले होते.पण धरणाच्या बॅक वॉटर मध्ये पुणे येथील ऐश्वर्या शिरीष धर्माधिकारी (वय 13 ) व शिरीष मनोहर धर्माधिकारी ( वय 45) या बाप लेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटना भोरच्या भाटघर धरण बॅक वॉटरला असणाऱ्या वेळवंड पांगारी खोऱ्यातील जयतपाड (ता. भोर) येथे घडली आहे. .

याबात भूषण वामण फालक (वय 43, रा. बालेवाडी, पुणे यांनी खबर दिली. ते कुटुंबासह जयपाड (ता. भोर) येथील मुंगळे रिसॉर्ट (सीमा फार्म) या ठिकाणी मंगळवारी (दि. 15) सलग सुट्टी असल्याने त्यांची मुलगी अनघा हिची मैत्रीण ऐश्वर्या शिरीष धर्माधिकारी (वय 13), यांचे आई -वडील, दोन मैत्रिणी, तसेच शिरीष मनोहर धर्माधिकारी (वय 45, रा. औंध पुणे) पर्यटनासाठी आले होते. दुपारी चारच्या सुमारास सीमा फार्म पाठीमागे असणाऱ्या भाटघर धरणाचे बॅकवॉटर, धबधबा व बेबी पुल पाहण्यासाठी किनाऱ्यावर गेले.

धरणाच्या किनाऱ्याजवळून न येता ते पाण्यात उतरले. त्यानंतर त्यांची मुलगी ऐश्वर्या बेबी पुलाजवळ पाण्यात खेळत होती. तिचे वडीलांनी तिला खोल पाण्यात जवळ बोलावून घेतले. दोघेही पाच ते सहा मिनिट खोल पाण्यात पोहत होते. त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला मात्र दोघेही खोल पाण्यात ओढले गेले व थोड्या वेळाने पाण्यात बुडाले.

पोलीस उपाधीक्षक रेखा वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक खुटवड, पोलीस नाईक सुशांत पिसाळ, धर्मवीर खांडे, अभय बर्गे, ठाणे अंमलदार वर्षा भोसले, दत्तात्रय खेंगरे घटनास्थळी जाऊन मृत देह ताब्यात घेऊन भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close