महिला गेली नाल्यात वाहून.
यवतमाळ – आरविंद वानखडे
यवतमाळ : बांगर नगर पेट्रोल पंप समोरील मोठ्या नाल्या मध्ये घरगुती काम करणारी महिला नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेली. तर त्याच जागी ऐक मुलगा वाहून जात असताना नाल्यालगच्या लोकांच्या आधार त्या पाण्याबाहेर काढण्यात यश आले. ही घटना गुरवार (ता. २७) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ मध्ये गेल्या चार दिवसा पासून पावसाने विश्रांती घेतली होती.आज जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील नाल्याला पूर आला. अदाजे ही महिला कामावरून घरी परत येत असताना पेट्रोल पंप समोरिल नाल्याच्या मोठ्या खडा असून नाली व रस्त्यावरून पाणी वरून वाहत असल्याने नाल्याच्या अंदाज घेता न आल्याने महिला रस्ता ओलांडून येण्याच्या प्रयत्नात ही महिला वाहून गेल्याची माहिती आहे.पेट्रोल पंप वरील काम करणारे व त्या महिलेला वाचिण्याच्या प्रयत्न करणारे प्रत्यक्षदर्शी शुभम मसराम याने त्या महिलेला वाचिण्याचे अतोनात प्रयत्न केले.अशी माहिती त्याने दिली ही महिला काम आटोपून घरी येत असतानाच अचानकपणे नाल्याला पूर आल्याने रस्त्याच्या अदाज घेता न आल्याने त्या पुरात वाहून गेल्या.
घटनेची माहिती मिळताच नगर परिषद मुख्याधिकारी व त्यांची टीम जेसीपी च्या साह्याने महिलेचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान परिसरातील नागरिक व रस्त्याने ये जा करणाऱ्या बघ्या लोकांची गर्दी मोठ्या संख्येने होती.
पोलिस व नगर परिषद पथकाने शोधमोहीम सुरू केली. सकाळी ११ वाजता पासून ही शोध मोहीम सुरू असून अद्यापही त्या महिलेचा शोध लागला नाही. या संदर्भात पोलिस तपास करीत आहेत.