सामाजिक

खानापूर येथील राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्धस्तरावर पूर्ण करा – खासदार डॉ. अनिल बोंडे

Spread the love

जिल्हाधिकाऱ्यांसह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

मोर्शी(तालुका प्रतिनिधी)दि.३!/५

अमरावती : मोर्शी-चांदूरबाजार मार्गावरील राष्ट्रीय महामार्गाचे काम पावसाळ्यापूर्वी युद्धपातळीवर पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्याच्या सूचना खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना केल्या.
प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या दालनात खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खानापूर येथील नागरिकांच्या समक्ष मोर्शी-चांदूरबाजार रोडवरील खानापूर येथील राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण आहे. त्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मोर्शी भाजपा तालुकाध्यक्ष प्रवीण राऊत, उपाध्यक्ष शरद काटोलकर, ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रशांत राऊत, शेखर गावंडे, दत्तात्रय गेडाम, सचिन गोमकाळे यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.
माहितीनुसार, मोर्शी चांदूरबाजार राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या खानापूर येथील हायवेचे काम अपूर्ण आहे. 26 नागरिकांच्या जागा हायवेच्या कामासाठी घेतल्या जाणार आहेत. त्यांनी आपापले वारस ठरवून रक्कम तातडीने उपलब्ध करून घ्यावी, जेणेकरून पावसाळ्यापूर्वी महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकेल. आदी समस्या लक्षात घेता खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी खानापूर येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक घेऊन नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना केल्या. बैठकीला जिल्हा पुनर्वसन अधिकारी अतुल दळवी, उपविभागीय अधिकारी डॉ.नितीन व्यवहारे, आशिष बिजवल, जलसंपदा विभागाचे अभियंता श्रीमती देशमुख यांच्यासह अन्य उपस्थित होते.

खोपडा येथील पुनर्वसन झालेल्यांना सुविधा द्या
खोपडा येथील नागरिकांना पुनर्वसना संदर्भातील ज्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्या होत्या अद्यापही देण्यात आल्या नसल्याने येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत खासदार डॉ. अनिल बोंडे यांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात डॉ. अनिल बोंडे यांनी बैठक घेत येथील पुनर्वसन झालेल्या नागरिकांची घरे पडायला आलेली आहेत. येथे मोठ्या असूविधांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे खोपडा येथे पावसाळ्यापूर्वी अधिकाऱ्यांनी भेटी देऊन नागरिकांना संपूर्ण सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांना दिले. यावेळी खोपडे येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close