जवळा येथील हिंदू मशान भूमी कडे नाही कुणाचेच लक्ष.
# प्रेत पेटवण्याचा ओटा पूर्णपणे खचला.
चांदुर रेल्वे (ता. प्र.) प्रकाश रंगारी
जवळा येथील हिंदू मशानभूमीकडे गाववाल्यांचं लक्ष नाही. असे आज मशानभूमीत गेल्यानंतर दिसून आले.
गेल्या कित्येक दिवसापासून जवळा येथील हिंदू मशान भूमीतील प्रेत पेटवायचे ओटे पूर्णपणे खचून पडलेले आहेत. परंतु याकडे गावकऱ्यांचे लक्ष नाही असे दिसून येत आहे. पावसाळ्याच्या दिवसात प्रेत पेटवायचे असल्यास कसे पेटवावे हा प्रश्न आता जनतेच्या मनात येईल. स्मशानभूमी ही संपूर्ण गावासाठी एकच असून गावातील सर्व प्रेत ह्याच स्मशानभूमीत आणल्या जाते. परंतु स्मशानभूमीची अवस्था पाहून लोकांना असा प्रश्न पडला असेल की प्रेत स्मशानभूमीत न्यावं की मशानभूमीच्या बाहेर पेटवावं. ह्या मशानभूमीचा विचार होईल का. ओटे पुन्हा बांधून मिळेल का. असा प्रश्न जनतेच्या मनात येत आहे. याकडे ग्रामपंचायत ने लक्ष देणे गरजेचे आहे.