विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला दिले असे सरप्राईज की त्या भावविभोर झाल्या
शिक्षक दिनावर विद्यार्थ्यांची शिक्षिकेला अनोखी भेट
सोशल मीडियावर दिवसाला अनेक व्हिडीओ व्हायरलं होत असतात. यातील काही व्हिडीओ लोकांना खूप आवडतात. त्यात काही तरी नवखे असल्याने युजर्स त्या व्हिडीओवर अक्षरशः कॉ्नेंट्स आणि लाईक्स चा पाऊस पाडतात. नेटीझन्स कडून भरभरून प्रतिसाद मिळावा असा हा व्हिडीओ आहे. नेटीझन्स ने याला भरभरून प्रतिसाद दिला आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक शिक्षिका शाळेच्या लॉबीमधून धावत जाताना दिसतेय. एका वर्गात काही विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाल्याचं या शिक्षिकेला सांगण्यात आलं होतं.
यानंतर ती शिक्षिका टीचर रुममधून धावत थेट वर्गात पोहोचली. पण ज्यावेळी शिक्षिका वर्गात पोहोचली त्यावेळी आतलं दृष्य पाहून शिक्षिकेला आश्चर्याचा धक्का बसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कुठचा आहे व्हायरल व्हिडिओ? व्हायरल होणारा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील एका शाळेतला असून शिक्षक दिनाला विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षिकेला सरप्राईज दिलं आहे. मुलांनी मारहाणीचं केवळ नाटक केलं होतं. हा व्हिडिओ कराडमधल्या जयवंत इंटरनॅशनल स्कूलमधला असून दहावीतल्या सरगम नावाच्या एका विद्यार्थिनीने आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 80 मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत.
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
मुलांनी आपल्या शिक्षिकेला सरप्राईज देण्यासाठी सुंदर प्लान तयार केला. काही विद्यार्थ्यांनी शिक्षिकेकडे जाऊन वर्गात काही विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाल्याचं सांगितलं. हे ऐकताच शिक्षिका टीचर रुममधून धावत वर्गाकडे निघाली. पण वर्गात प्रवेश करताच तिला सरप्राईज मिळतं. विद्यार्थी अचानक तिच्यावर फुलांची बरसात करत तिचं स्वागत करतात. काही मुलं तिला फुलांचा गुच्छा देतानाही या व्हिडिओ दिसतंय. यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजत शिक्षिकेला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.
आधी रागात वर्गात आलेली शिक्षिक अचानक मिळालेल्या सरप्राईजमुळे भारावून गेल्याचं या व्हिडिओ पाहायला मिळतंय. विद्यार्थ्यांची मारहाण ही केवळ आपल्याला सरप्राईज देण्यासाठी होतं हे कळल्यावर शिक्षकेला आपल्या भावना अनावर होतात.
हा व्हिडिओ लोकांच्या चांगल्याच पसंतीत पडला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटलंय ‘विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाल्याचं कळताच ती शिक्षिका ज्या पद्धतीने धावत जातेय, त्यावरुन या शिक्षिकेला आपल्या विद्यार्थ्यांची किती काळजी आहे हे कळतं. एका युजरने शिक्षिका आणि तिला सरप्राईज देणाऱ्या विद्यार्थ्यांचंही कौतुक केलं आहे.