क्राइम

स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन पांढरकवडा यांची कोंबडा बाजारवर संयुक्त कार्यवाही

Spread the love

यवतमाळ / प्रतिनिधी 

गोपनीय माहीती वरून स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व पोलीस स्टेशन पांढरकवडा यांनी ग्राम मोहदा गावाचे बाजुला असलेल्या शेतशिवार लगतच्या जंगलामध्ये सार्वजिनक खुल्या जागेत कोंबड्याच्या पायाला लोखंडी काती बांधुन त्यांची झुंज लावुन त्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा खेळ खेळणा-या इसमांवर कार्यवाही केली.

सदर कार्यवाहीत १) श्रिक्षण मारोतराव नेहारे वय ५५ वर्षे, रा. कोटंबा ता. बाभुळगाव जि. यवतमाळ यांचे पासून १ नग कोबंडा किमंत ५००/- एक काती किमंत २०/- मोटोरोला कंपनीचा एक मोबाईल ज्याचा ३५३१९६१३२९९३७५८ किंमत १०००/- व नगदी २,२३०/- रुपये मिळुन आले व एक गॅम्लर कंपनीची मोसा जिचा कमांक एम.एच ३२ यु ०८१८ किंमत ३०,०००/- रू

२) निलेश हरिश्चंद्र कलोडे वय २८ वर्षे, रा. इंदिरा शाळे जवळ अल्लीपुर ता. हिंगणघाट जि. वर्धा यांचेपासून यांचे पासून १ नग कोबंडा किमंत ५००/-रू, एक आयटेल कंपनीचा निळया रंगाचा मोबाईल फोन किंमत ७००/- एक सिलेकोर कंपनीचा राखाडी रंगाचा मोबाईल फोन किंमत ५००/- एक काती किमंत २०/- व नगदी १२१०/- रुपये ३) मारोती भिमराव कोटनाके वय ३२ वर्षे, रा. डोंगरखर्डा ता. कंळंब जि. यवतमाळ यांचे सॅमसंग कंपनीचा निळया रंगाचा एक मोबाईल फोन ज्याचा आयएमईआय कमांक ३५०३८५९१९६०३७३९ किंमत १०,०००/- नगदी ७००/-रुपये

४) उमेश बाबाराव आडे वय ३५ वर्षे, रा. जळका ता. राळेगाव जि. यवतमाळ याचे पासून एक नग कोबंडा किमंत ५००/-रु, नगदी १,१००/- रुपये, रेड मी कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल ज्याचा आयएमईआय कमांक ८६९२७१०६९६०२९८२ किंमत १०,०००/- व स्पॅल्डर काळया रंगाची जिचा कमांक एम.एच. २९ यु ४७५९ किंमत ३०,०००/-

५) गणेश राजेश पवार वय २८ वर्षे, बोर्दुर्णी ता. हिंगणघाट यांचे पासून नगदी १०००/- रुपये, एक व्हिओ कंपनीचा काळया रंगाचा मोबाईल ज्याचा आयएमईआय कमांक ८६०३७४०६५९०५६९५ किंमत १०,०००/-

६) करीम अंकुश पवार वय ३६ वर्षे, रा.

बोर्दुर्णी ता. हिंगणघाट जि. वर्धा यांचे पासून नगदी १३००/- रुपये

असा वरील आरोपीतान कडुन नगदी ७५४०/- रुपये व २ काती ४०/- रूपये लिलाव कोबडे किमंत १५००/-रूपये. तसेच २ मोटार सायकल किमत ६०,०००/- रूपये व ०६ मोबाईल फोन एकुण किंमत ३२,२०० असा एकुन १,०१,२८०/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करन्यात आला असुन करून सदर कोंबडा बाजार भरवीनारे विजय जाधव व अजय विजय जाधव दोन्ही रा. मोहदा सह एकुन ०८ आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अन्वये कार्यवाही करन्यात आली.

सदरची कार्यवाही मा.श्री. कुमार चिंता पोलीस अधीक्षक सा. यवतमाळ, मा.श्री पियुष जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक सा. यवतमाळ, मा.श्री. रामेश्व वेंजने सा., उपविभागीय पोलीस अधीकारी, पांढरकवडा मा.श्री ज्ञानोबा देवकते पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाख यवतमाळ, मा.श्री. दिनेश झांबरे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनात सपोनि अजयकुमार वाढवे, सपोनी सागर पेंढारकर, पोउपनिरी धनराज हाके, पोहवा सुनिल खंडागडे, पोना सुधिर पिदुरकर, पोकों रंजनिकांत मडावी, पोशि धनंजय श्रिरामे, पोशि आकाश सहारे चालक पोना सतिष फुके पोकों विकेश ध्यावर्तीवार यांनी पार पाडली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close