सामाजिक

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर 48 तासात महिला दगावली

Spread the love

गडचिरोली / नवप्रहार मीडिया

                       शासन शासकीय यंत्रणा योग्य प्रकारे क्रियांवित व्हावी यासाठी प्रयत्नशील असले तरी प्रशासन मात्र आपले काम।चोख रित्या बजावत नसल्याचे अनेक घटनेतून समोर आले आहे. येथे नुकत्याच घडलेल्या एका घाटाने नंतर आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.येथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या 48 तासानंतर महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महिलेची दोन मुले उघड्यावर आली आहेत.

ही घटना धानोरा तालुक्यातील कारवाफा येथे घडली. महिलेला दोन दिवसापूर्वी कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी ग्रामीण आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते. मात्र तिचा मृतदेहच घरी आल्याने कुटूंबीयांना धक्का बसला आहे. दोन चिमुकली मुले आईविना पोरकी झाली आहेत.

कुटूंबीयांनी डॉक्टरांवर उपचारात निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला आहे. साधना संजय जराते (वय 23 , रा. कारवाफा) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी (8 डिसेंबर) कारवाफा येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले होते. याच शिबिरात साधना हिच्यावर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती खालावू लागली. त्यानंतर त्यांना गडचिरोलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान 10 डिसेंबरला मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबाने ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रावर हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला असून दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. याबाबत जिल्हा आरोग्य विभागाची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

मृत साधना या गृहिणी होत्या तर पती आचाऱ्याचे काम करतात. साधना यांना चार व दीड वर्षांची दोन मुले आहेत. दोन मुलांनंतर त्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र या शस्त्रक्रियेने साधना यांचा मृत्यू झाल्यानं दोन्ही मुले आईविना पोरकी झाली आहेत. आज शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close