हटके

रक्षाबंधनासाठी  आलेल्या बहिणींचा त्या गोष्टीने पारा चढला आणि त्यांनी वहिनीला धो धो धुतले

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया

                  रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या नात्यातील एक पवित्र सण म्हणून ओळखल्या जातो. बहीण कितीही लांब असली तरी ती राखी बांधायला भावाकडे येतेच. भाऊ बहिणीला आपल्या शक्ती नुसार भेटवस्तू देखील देतो. पण याच भेटवस्तूला घेऊन वैनी आणि तीन नणदेत तुफान हाणामारी झाली आहे. ज्यात वैनी गंभीर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

घटना दिल्लीच्या मैदानगढी परिसरात घडली आहे. येथे नर्सिंगचे काम करणारी महिला आपल्या पतीसोबत राहते. रक्षाबंधनच्या दिवशी तिच्या तिन्ही नंदा घरी आल्या होत्या. बहिणी घरी आल्या म्हणून भाऊ फार आनंदी होता. घरी गोडाधोडाचं जेवण बनवण्यात आलं. राखी बांधताना भावा बहिणीत काही कारणावरुन वाद झाला.

पुढे बहिणींनी भावाला राखीबांधली आणि ओवाळणीत २१ हजार रुपये मागितले. प्रत्येकीला २१ हजार रुपये देण्याइतका भावाचा खिसा भरलेला नव्हाता. आपल्या पतीची परिस्थिती पत्नीला पाहवली नाही. भावा-बहिणीच्या संवादात ती मध्ये पडली. याचा बहिणींना फार राग आला. त्यांनी संपूर्ण राग वहिनीवर काढला. पैसे न दिल्याने या नंदांनी आपल्या वहिनीला बेदम मारहाण केली.बहिणींनी मागितलं मोठं गिफ्ट

आपल्या नंदा मारहाण करत असल्याने वहिनीने पोलिसांना फोन लावला. मात्र पोलिसांशी काही बोलण्याआधीच घरातील इतर सदस्स्यांनी तिला मारहाण केली. मारहाणीत पीडितेची तब्येत इतरी बिघडलीकी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. नंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलीस सध्या या प्रकरणी तपास करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close