क्राइम

मारणाऱ्या पेक्षा तारणारा मोठा असल्याचा आला प्रत्यय 

Spread the love

दारुड्या बापाने आपल्या 5 वर्षाच्या मुलाला मेडिकल च्या 2 ऱ्या मजल्यावरून फेकले 

देवरीया (युपी) / नवप्राहार डेस्क 

                        मारणाऱ्या पेक्षा तारणारा मोठा असतो असे म्हटल्या जाते. देवरीया येथील नागरिकांना याचा प्रत्यय आला आहे. येथे एका  दारुड्या बापाने आपल्या पाच वर्षाच्या मुलाला मेडिकल कॉलेज क्या दुसऱ्या मजल्यावरून फेकले. पण सुदैवाने खाली असलेल्या ऐका व्यक्तीने त्या मुलाला अलगद झेलले. त्यामुळे मुलाचा जीव वाचला आहे. यानंतर लोकांनी आरोपी बापाला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, गौरी बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोपरी येथे राहणारा विनय प्रसादला अंमली पदार्थांच्या आहारी गेला आहे. त्याचा 5 वर्षीय मुलगा लकी हर्नियाने त्रस्त होता, त्यामुळे त्याची आईने त्याला महर्षी देवराह बाबा मेडिकल कॉलेजमध्ये ऑपरेशनसाठी भरती केले होते. रविवारी सकाळी पती-पत्नीचे भांडण झाले, ज्यामुळे आरोपी बापाने मुलाला लघवी करण्याच्या बहाण्याने खिडकीजवळ नेले आणि खाली फेकले. सुदैवाने खाली उभ्या असलेल्या व्यक्तीने त्या मुलाला हातात झेलले.

पोलिसांनी आरोपीला सोडले
यानंतर मुलाला तात्काळ इमर्जन्सी वॉर्डात नेले. तर, तिथे जमलेल्या लोकांनी आरोपी बापाला बेदम मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर कोतवाली पोलिस ठाण्याचे प्रभारी दिलीप सिंह यांनी सांगितले की, आरोपी वडिलांना ताब्यात घेण्यात आले, परंतु त्याच्या कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार नोंदवली नाही, त्यामुळे आरोपीला सोडून देण्यात आले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close