अरविंद बाभळे यांची शासनाच्या नाट्य सेन्सॉर बोर्डाच्या सदस्य पदी निवड.
आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळावर अशासकीय सदस्य पदी नियुक्ती करण्यासाठी शासनाने
जेष्ठ लेखक.कलावंत अरुण नलावडे. प्रसाद कांबडी व जेष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांची कमिटी स्थापन केली होती.
त्यांनी संपुर्ण महाराष्ट्रातून आलेल्या 208 जेष्ठ कलावंतांच्या अर्जातून फक्त 36जेष्ठ अनुभवी कलावंताचे नावांची निवड
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतीक मंत्री मा.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना निवड केलेल्यांची यादी दिली.
त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना ती यादी दिल्यानंतर
मा.राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांनी केलेल्या शिफारशी नुसार
कलविषकार मंडळ पुलगाव चे सिने – नाटय कलावंत – दिग्दर्शक श्री.अरविंद बाभळे यांची वर्धा जिल्हातून
शासनाच्या सांस्कृतिक व पर्यटन विभागाच्या अंतर्गत असलेल्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळावर अशासकीय सदस्य पदी
/नाटय सेन्सॉर बोर्ड सदस्य पदी/नियुक्ती करण्यात आली.
अरविंदचे सांस्कृतीक, समजिक, सार्वजनिक व कामगार क्षेत्रातही भरपूर योगदान आहे.
ते भारतीय मजदुर संघ संलग्नित महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन एस टी कामगारांच्या युनियन चे महाराष्ट्र अध्यक्ष पदी काम करीत आहे.
तसेच ते कलाविषकार मंडळ पुलगाव चे कोषाध्यक्ष असून. तेली समाज पुलगाव चे अध्यक्ष आहे. संस्कार भारती चे सदस्य असून विवेकानंद. मातृ सेवा. अणि हेडगेवार पत संस्थाचे सदस्य सुधा आहे.
त्यांच्या या निवडीसाठी पुलगाव नाट्य रसिकांनी. मित्र परिवार व कलाविषकार प रिवार. गांधी नगर परिवार.भाजपा . शिवसेना . आप.व काँग्रेस. पक्षाने त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.