क्राइम

प्रेम विवाहाचा दुःखद शेवट , पत्नीला कोयत्याने वार करत संपवले 

Spread the love

बोरी  / नवप्रहार मीडिया

                   त्या सोघांची ओळख सोशल मीडियावर झाली होती. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी अल्पवयीन असतांना सुद्धा लग्न केले. जयश्री वाव्हळ १९ आणि रोहित गायकवाड आहि त्यांची नावे. या दोघांनी लग्न केले तेव्हा जयश्री १५६ तर रोहित २० वर्षाच होता. लग्नानंतर दोघेही छत्रपती संभाजीनगर येथे रहायला आले होते. संभाजीनगर येथील एका खाजगी कंपनीत रोहित नोकरी करीत होता. प्रेमविवाह झाला असला तरी हे प्रेम फार काळ टिकले नाही आणि या नात्याला संशयाचा भुंगा पोखरू लागला. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमधले वाद प्रचंड वाढले होते. म्हणून जयश्री वाव्हळ शालेय शिक्षणासाठी तिच्या आई-वडिलांकडे बोरी येथे राहायला आली होती.

घटनेच्या दिवशी जयश्री नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना पती रोहितने तिला बोरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागील रस्त्यावर अडवले. पत्नीबद्दल मनात संशय एवढा भरला होता की, रागाच्या भरात पत्नी जयश्रीच्या गळ्यावर व चेहऱ्यावर धारदार कोयत्याने वार केले. यात ती गंभीर जखमी झाली. यावेळी या ठिकाणच्या वस्तीमधील नागरिकही रस्त्यावर उपस्थित होते. मात्र, कोणीही तिच्या मदतीसाठी धावले नाही. उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक सरला गाडेकर, पोलिस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे, पोलिस जमादार काळे, तूपसुंदर घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास चालू आहे.

दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी गोफणे, परभणीच्या मोबाइल फॉरेन्सिकचे अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. या प्रकरणी जयश्रीचे वडील विश्वनाथ वाव्हळ यांच्या फिर्यादीवरून रोहित गायकवाड याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close