हटके

ऑटो वाल्याचा जुगाड पाहून तुम्हीही म्हणाल वाह क्या बात है !

Spread the love
!

                  समाज माध्यमांवर (सोशल मीडिया ) रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक व्हिडीओ मध्ये लोक आपली कल्पकता वापरून काही तरी नवीन करतात. आणि ही बाब सर्वसामान्यांना इतकी आवडते की लोक त्या व्हिडीओ ला पसंती देत त्यावर कॉमेंट्स देखील करतात. सध्या सोशल मीडियावर असाच यरक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

           उन्हाचा।पारा दिवसागणिक वाढत आहे. अश्यवेळी सगळ्यांनाच थंडगार वारा हवा असतो. पण ऑटोत तो कुठुन येणार.पण ऑटोत बसलेल्या प्रवाश्यांना आणि स्वतःला थंड हवा मिळावी यासाठी जुगाड लावला आहे.

 सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात एका ऑटो रिक्षा चालकाने उन्हाच्या गरम वाऱ्यापासून वाचण्यासाठी चक्क अनोखा जुगाड शोधून काढलाय. आपण अनेकदा ऑटो रिक्षामध्ये प्रवाशांच्या सोईसाठी अनेक वेगवेगळे उपाय असलेले पाहतो. प्रवाशांचा प्रवास सोईस्कर व्हावा यासाठी वाहन चालक यासाठी अनेक त्यांच्या ऑटो रिक्षामध्ये अनेक जुगाड करताना दिसून येतात त्यात सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची नेटकरी वर्गात तूफान चर्चा होतेय.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता रस्त्यावर अनेक वाहने उभी आहेत.त्यातच या रस्त्यावर एक रिक्षाही आहे. यात वेगळेपण म्हणजे रिक्षाच्या वाहनचालकाच्या तिथे एक पाईप लावण्यात आली आहे. खर तर नीट पाहिल्यावर समजते की उन्हाच्या उष्णतेपासून वाचण्यासाठी रिक्षाला तशी पाईप लावण्यात आली आहे. या पाईपचा अर्धा भाग रिक्षामध्ये आहे तर अर्धा भाग रिक्षाच्या बाहेरच्या बाजूला आहे. जेव्हा रिक्षा जोरात धावेल तेव्हा पाईपद्वारे दुसऱ्या बाजून थंड हवा रिक्षाच्या आत बसलेल्या प्रवाशांना आणि वाहनचालकाला थंडावा देईल.

 

 

 

 

व्हिडिओ व्हायरल होताच रिक्षाचालकाचे कौतुक करण्यात येत असून अनेकांनी विविध प्रतिक्रिया केल्या आहेत. व्हिडिओ तामिळनाडूमधील असून @sangeeramexया सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close