मंगरूळ दस्तगीर येथे श्रीसंत लहानुजी महाराज जयंती महोत्सव

आजपासून सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्रम
प्रतिनिधी – राहुल चांभारे
पिंपळखुटा, ता. १३ : मंगरूळ दस्तगीर येथील श्रीसंत लहानुजी महाराज मंदिरात परमहंस श्रीसंत लहानुजी महाराज यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन बुधवार १३ मार्च ते मंगळवार १९ मार्चदरम्यान करण्यात आले आहे.
अजित महल्ले यांच्या हस्ते तीर्थस्थापना करून या महोत्सवाला सुरवात होणार आहे. या महोत्सवात दररोज रात्री सात वाजता सामुदायिक प्रार्थना व त्यात अशोक कुरडकर, श्री. कुंभारे, ओंकार देशमुख, रवी चौधरी, बाबाराव गेडाम, दीपक इंगळे यांचे सामुदायिक प्रार्थनेवर भाषण, तर रात्री सात वाजता चेतन महाराज उके, वैभव महाराज घावट, नंदकिशोर महाराज हलमारे, संजय महाराज ठाकरे, नंदकिशोर महाराज चिकटे, उमेश महाराज जाधव यांची कीर्तने होणार आहेत. तसेच हेमराज वानखडे, श्री. कुंभारे, ओंकार देशमुख यांचे प्रवचन
होईल. परमहंस श्रीसंत शंकरबाबा महाराज यांच्या पावन उपस्थितीत या महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम १९ मार्चला होणार आहे. मंगळवार १९ मार्चला श्रीसंत लहानुजी महाराज यांच्या पालखीची शोभायात्रा निघणार असून पुणे येथील नंदूशेठ चव्हाण, राजेश लुंगे, भास्कर मोहोड व गावकरी मंडळी यांच्या हस्ते पूजन होईल. सकाळी नऊ वाजता देवेंद्र महाराज वाल्हेकर यांचे गोपालकाल्याचे कीर्तन, परमहंस श्रीसंत शंकर महाराज यांच्या स्वस्वरूपाच्या स्वानुभूतीची अमृतवाणी, आरती, कालावाटप व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. या महोत्सवात भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजन समितीने केले आहे.