ब्रेकिंग न्यूज
घरासमोर उभ्या असलेल्या सदश्यांच्या अंगावर चढवली कार ; तिघांचा मृत्यू

पूर्व वैमनश्यातुन घटना घडल्याची चर्चा
घटनेचा वेळी चालक नशेत असल्याची चर्चा
दर्यापूर (अमरावती) / प्रतिनिधी
अमरावती जिल्यातील दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात भयंकर घटना घडली आहे. कार चालकाने घरासमोर उभ्या असलेल्या एकाच कुटुंबातील सहा लोकांच्या अंगावर कार घातली आहे. यात तिघांचा मृत्यू झाला आहे तर तीन लोक गंभीर जखमी आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटना पूर्व वैमनश्यातवून घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कार चालकाच गावात अवैध दारू व्यवसाय असल्याचे समजते.
दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात या घटनेनंतर तणावाचे वातावरण आहे. वाहन चालवणाऱ्या व्यक्तीने जुन्या वैमनस्यातून रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे. आरोपीने आपली कार पीडित कुटुंबाच्या घराजवळ नेली. त्यावेळी घराजवळ उभे असलेल्या कुटुंबातील काही सदस्यांच्या अंगावर जाणून बुजून कार नेली आणि त्यांना उडवले. आरोपी हा गावात बेकायदेशीरपणे दारु विक्री करत असून कायम नशेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून अन्य तीन गंभीर जखमी झाले आहेत. दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नाचोना या गावात हा भयंकर प्रकार घडला आहे. आरोपीचे नाव चंदन गुजर असल्याची माहिती आहे.
या घटनेत अनुसया शामराव अंभोरे (वय 67), शामराव लालूजी अंभोरे (वय 70) आणि अनारकली मोहन गुजर (वय 43) यांचा मृत्यू झाला. तर, जखमींमध्ये शारदा उमेश अंभोरे (वय 40) उमेश अंभोरे (वय 40)
किशोर शामराव अंभोरे (वय 38) यांचा समावेश आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |