तरुणाकडून तरुणीचा निर्घृण खून : कारण अस्पष्ट
सांगली / नवप्रहार मीडिया
अक्षता कोरे वय वर्ष 19 ही बीए च्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी तिला तिचे वडील रोज कॉलेज ला सोडायला यायचे. दि.11 मार्च रोजी देखील अक्षता च्या वडिलांनी तिला कॉलेज च्या गेट वर सोडले।आणि निघून गेले.नित्यनियमाप्रमाणे कॉलेज सुटल्यावर ते तिला घ्यायला आले. पण त्यांना अक्षता आढळली नाही.शक्य तेथे शोधाशोध आणि परिचितांना फोन करून माहिती घेतल्यावर देखील तिच्या बद्दल त्यांना काही कळत नसल्याने त्यांनी पोलिसात जाण्याचे ठरवले. इतक्यात त्यांना माहिती मिळाली की अक्षता चा मृतदेह कॉलेज पासून काही अंतरावर सुनसान जागेत आढळला आहे. ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कोणी काहीच बोलायला तयार नव्हते.
घटनेबद्दल पोलिसांना माहिती झाल्यावर पोलिसांनी आपल्या परीने तपास सुरू केला तेव्हा जी स्टोरी समोर आली ती अशी की अक्षता चे निखिल कांबळे वय वर्ष 21 सोबत प्रेम संबंध होते. आणि याच संबंधातून अक्षता ची हत्या झाली. आता अक्षता स्वमर्जीने त्या ठिकाणी गेली किंवा तिला जबरीने त्या ठिकाणी नेण्यात आले. हे पोलिसांच्या चौकशीत समोर येईल . परंतु निखिल ने अत्यंत निर्घृण पाने तिची हत्या केली आहे.
अक्षता ची गळा आवळून हत्या केल्याचे निखिल ने मान्य केले आहे. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येऊ नये म्हणूनतीच्या तोंडात कापडाचा बोला कोंबण्यात आला होता. इतकेच नाही तर तिच्या डोक्यात भलामोठा दगड देखील घालण्यात आला होता. आता ही हत्या एकतर्फी प्रेमातून घडली की निखिल ने लक्षात पुढे अशी काही अट ठेवली ती तिला मान्य नव्हती. आणि तिने निखिल चा विरोध केला म्हणून निखिल ने रागाच्या भरात हे घातक पाऊल उचलले. हे सगळे प्रश्न सध्या गुलदस्त्यात आहेत. निखिल ने सादर कृत्य त्याने केल्याची कबुली दिली आहे. पुढे पोलीस तपासात सगळे काही समोर येईलच
पण मुलींनी सुद्धा आता सतर्क राहून जोडीदार निवडणे आवश्यक झाले आहे. तारुण्यात प्रवेश केलेले तरुण एकमेकांच्या प्रति आकर्षित होऊन जवळ येतात.आणि या जवळीकीला प्रेम असे नाव दिल्या जाते. वास्तविक पाहता मुले प्रेमाचे नाटक करत मुलींना आपल्या प्रेमजाळ्यात ओढतात .आणि मग त्यांचे लैंगिक शोषण करून त्यांना ब्लॅकमेल करतात. जर तरुणी त्याच्या मर्जीप्रमाणे वेगळी नाही तर आग असे कृत्य करतात.