हटके

कॉफी हाऊस मध्ये प्रेमीयुगलांचे अश्लील चाळे; पोलिसांची धाड

Spread the love

अर्ध्या तसासाठी आकारल्या जायचे 500 रु . 

जालना / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

               कॉफी हाऊस मध्ये बसून अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमीयुगलांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. तर या प्रेमीयुगलांना त्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॉफी संचालकांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. प्रेमी जोडप्याला अर्ध्यातासासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्याकडून 500 रु आकारल्या जायचे अशी माहिती तपासात समोर आली आहे.

या प्रकरणी दोघांविरुध्द सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील आझाद मैदान येथील कॅफे थिकिंग कॉफी शॉपमध्ये सर्रासपणे तरुण-तरुणी आंबट चाळे करीत असल्याची माहिती सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी शनिवारी सदर ठिकाणी डमी जोडपे पाठविले. डमी जोडप्याने पाहणी केली असता, तेथे सर्रासपणे आंबट चाळे सुरू असल्याचे दिसून आले. या जोडप्याने पोलिसांना इशारा करताच, पोलिस निरीक्षक महाजन आणि इतर कर्मचाऱ्यांनी सदर कॉपी शॉपमध्ये धाड टाकली. यावेळी चार जोडपी अश्लिल चाळे करताना आढळून आली. शिवाय, काऊंटरवर संशयित आकाश नारायण मोरे (२७, रा. धांडेगाव, ता. जालना), आशिष विष्णू आंबडकर (२३, रा. भिलपुरी, ता. जालना) हे दोघे मिळून आले.

त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, ते येणाऱ्या जोडप्यांची कोणतीही माहिती आणि नोंद ठेवत नव्हते. शिवाय, जागेबाबत कॅफे चालविण्याच्या तसेच आतील भागामध्ये केलेल्या बदलाबाबत संबंधित विभागाची परवानगी नसल्याचे दिसून आले. कॅफेमध्ये सहा वेगवेगळ्या पध्दतीचे कम्पार्टमेंट करण्यात आल्याचे आढळले. त्याला लाकडासह कपड्याच्या पडद्याद्वारे आडोसा तयार करण्यात आला होता. ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे, डीवायएसपी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन, पोउपनि. दिपाली शिंदे, पोहेकॉ. रामप्रसाद रेंगे, जगनाथ जाधव, सोमनाथ उबाळे, भरत ढाकणे, प्रदीप कतारे यांनी केली आहे.

अर्ध्या तासासाठी घ्यायचे 500 रुपये
कॉफी शॉप चालक तरुण-तरुणींकडून अर्ध्या तासासाठी 500 रुपये घेत होते. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close