विदर्भ स्तरीय कला महोत्सव आयोजित ; गणमान्य लोकांची उपस्थिती
लाखनी- प्रतिनिधी
विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हान शाखा भंडारा तथा स्वर्गीय सुलोचना पारधीकर बहुउद्देशिय संस्था मासलमेटा तालुका लाखनी च्या संयुक्त विद्माने लोकशाहीर अन्नाभाऊ साठे जयंती व स्वर्गिय धर्मदास भिवगडे यांचे पुण्यतिथी निमित्त २८ व २९ आॕगष्ट २०२४ रोज बुधवार व गुरुवार ला संताजी मंगल कार्यालय लाखोरी रोड लाखनी येथे विदर्भस्तरीय सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दीपप्रज्वलन वैनगंगा बहुउद्देशिय शिक्षिण संस्था साकोली चे अध्यक्ष डाॕ.सोमदत्त करंजेकर,उद्घाटक माजी आमदार बाळाभाऊ काशिवार,सहउद्घाटक भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे,अध्यक्ष स्थानी विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मनीष भिवगडे,विशेष अतिथी केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकार टेंभुर्णे,भाजपा प्रांत सदस्या रेखा भाजीपाले,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवराम गिर्हेपुंजे,भाजपा तालुकाध्यक्ष श्रावण कापगते,विशेष पाहुणे भाजपा किसान आघाडी अध्यक्ष हरिंद्र रहांगडाले,जिल्हा परिषद सदस्सा सुर्मिला पटले,जि.प.सदस्या महेश्वरी नेवारे,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष घनश्याम खेडिकर,उपसभापती गिरीश बावनकुळे,सामाजिक कार्यकर्ता अशोक पटले,नगराध्यक्ष ञिवेणी पोहरकर,स्वामी कन्सट्रक्शन चे रामेश्वर बिसेन ,प्रमुख अतिथी बाजार समिती संचालक उमराव आठोडे ,रामकृष्ण वाढई ,महेश पटले,प्रेमकुमार गहाणे,जयहींद राईस मिल चे मोहसिन आकबानी ,साईबाबा राईस मील चे सारंग खेडिकर ,इंजी.प्रदीप रहांगडाले,दिनेश येळेकर,जिवन लंजे,मनोज पटले,अतुल भांडारकर,वसंता कुंभरे ,मिलींद खोब्रागडे,चुडामन लांजेवार,धनपाल बोपचे,लाखोरीचे सरपंच सुधिर चेटुले,मासलमेटाच्या सरपंचा आचल फेंडर,सालेभाटाचे सरपंच खुमेश बोपचे,राजेगावचे सरपंच नरेंद्र रामटेके,उपसरपंच नरेश ठाकरे,मोरगावचे उपसरपंच मनोहर पटले,गुढरीचे सरपंच मंगलमुर्ती रामटेके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.या विदर्भस्तरीय सांस्कृतिक कला महोत्सव विदर्भातील नाटक,तमाशा,नौटंकि,गोंधळ,भारुड,कलापथक,दंडार,किर्तन,भजन,डहाका,गायन,वादन,नृत्य,शाहीरी,नक्कल,पोवाडा,जात्यावरचे गाणी,रोवणीची गाणी विवीध सांस्कृतिक क्षेञातील पुरुष ,महीला बालकलाकरांचा दोन दिवसीय भव्य मेळावा घेण्यात आला.यात पञकार दिलीप बडोले,चंदन मोटघरे,कालीदास खौब्रागडे,डि.जी.रंगारी ,श्यामसुंदर उके,अंगेश बेहलपाडे,मदन कमाने,रवी धोतरे,राजेश सार्वे यांचेसह तिर्थानंद बोरकर व संच एकोडि,नेमीचंद फंदे व संच सोमलवाडा,अक्षय सार्वे व चेतन बडोले व संच लाखनी यांचा सत्कार करण्यात आला.या विदार्भस्तरीय सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन जिल्हाध्यक्ष डाॕ.रामनाथ पारधीकर ,उपाध्यक्ष आशिक राहुले,अशोक हुमने ,भाष्कर कमाने,जगदीश देव्हारे,पतीराम पुंडे,सुधिर लांजेवार,प्रेमदास गोटेफोडे,दामोधर मेहर,खुलेश्वर चवळे,खुशाल कोसरे,ज्योती वाघाये,देवांगना पटले,स्मिता बिसेन, अर्चना पुंडे,उत्तर निंबार्ते,लोटन पटले,प्रभाकर लिचडे,रघुनाथ कावळे,राजकुमार मेश्राम,जगदिश लांजेवार,कंठिलाल बिसेन,उदाराम येळे,साहेबराव टेंभरे आणि मंडळाने केले होते.कार्यक्रमात नागपूर,वर्धा,गडचिरोली,चंद्रपुर,गोंदिया,भंडारा येथिल कलावंतानी समाजप्रबोधन करुन सहभाग घेतला.