सामाजिक

हिंगणगाव (का) ग्रा.प. ठरली  तालुका स्तरीय स्वच्छता स्पर्धेची मानकरी

Spread the love
 10 लाखाचे मिळणार रोख बक्षिस
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी 
              हिंगणगाव कासारखेड ग्राम पंचयात तालुका स्तरीय स्वच्छता स्पर्धेची मानकरी ठरली असून ग्रा.प. ला शासनाकडून 10 लक्ष रूपयाचे रोख पारितोषिक मिळणार आहे.
              शासनाकडून ग्राम स्वच्छता योजना राबविण्यात येते. स्वच्छतेचे सर्व निकष असणाऱ्या ग्राम पंचायतीला आर आर पाटील ग्राम स्वच्छता पुरस्कार दिल्या जातो.  तालुका स्तरीय या पुरस्काराचे स्वरूप 10 लक्ष रोख असे असते.सॅन 2021 – 22 चा ग्राम स्वच्छता पुरस्कार धामणगाव पंचायत समितीतील हिंगणगाव कासारखेड या ग्रा. पं. ला मिळाला आहे.
           गावकऱ्यांसाठी ही अभिमानास्पद आणि अभिनंदनीय बाब आहे. गावकऱ्यांच्या मदतीशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नसते. गावकऱ्यांना स्वच्छतेचे फायदे पटवून दिल्याने गावकऱ्यांनी स्वच्छते कडे विशेष लक्ष दिल्याने आणि योग्य अति काळजी घेतल्याने  हे शक्य झाले आहे. यापूढे देखील गावकऱ्यांचे असेच सहकार्य अपेक्षित आहे.
       
                                    दुर्गाबक्षसिंह ठाकूर ,  सरपंच, ग्रा.पं. हिंगणगाव (का)
 सरपंच ज्यांना आम्ही बाबू म्हणतो त्यांनी आम्हाला सुरवातीला खताचे ढिगारे गावात न ठेवण्याबाबत , घरी संडास जरुरी करण्यासाठी सांगितले तेव्हा आम्हाला ते विनाकारण जबरदस्ती करीत आहेत असे वाटायचे.पण हळूहळू त्याचे परिणाम दिसत आहेत . स्वच्छतेकडे लक्ष दिल्याने गावातील रोगराई कमी झाली आहे. त्यामुळे आमची आर्थिक  बचत होत आहे. स्वच्छतेची सवय लावल्याने आणि त्याचे फायदे आम्हाला समजल्याने आम्ही सरपंच दुर्गाबक्षसिंह यांचे आभारी आहोत .
      गावकरी हिंगणगाव ( का)
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close