तालुक्यात ठप्प पडलेली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे तात्काळ सुरू करा. वंचित बहुजन आघाडी चा आंदोलनाचा इशारा
घाटंजी तालुका प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
घाटंजी गेल्या अनेक दिवसापासून पंचायत समितीचा कारभार ढेपाळला असून,तालुक्यातील शेतकरी व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विविध कामावर काम करणारे मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ते बेरोजगार झाले आहे आणि मग्रारोह च्या विविध योजनेचे प्रत्यक्ष लाभार्थी पंचायत समितीच्या निष्क्रिय कारभाराला कंटाळून गेले आहेत.पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता सकारात्मक नसून वंचित घटकाला न्याय देण्याकरिता दुर्लक्ष करतात त्यामुळे संपूर्ण तालुक्यात पंचायत समितीच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आसुन तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरू करावी याबाबत माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांना दिनांक 14 सप्टेंबर 2022 ला निवेदन देऊन सुद्धा पंचायत स्तरावर सुधारणा झालेली नाही. या योजने अंतर्गत तालुक्यात वैयक्तिक सिंचन विहीर ,गुरांची गोठे,शेत पांदण रस्ते, सिमेंट नाली बांधकाम ,शोष खड्डे ,नाडेप कंपोस्ट खड्डे ,वृक्ष लागवड, घरकुल योजना इत्यादी शेतकरी व ग्रामीण विकासाची कामे व मजुरांना मजुरी अशा व्यापक स्वरूपाच्या योजनेला तालुक्यात बट्याबोळ झाला व खिळ बसलेली आहे. यावर तात्काळ संबंधित यंत्रणा कार्यान्वित न झाल्यास तालुक्यातील वंचित घटकाला सोबत घेऊन शेतकऱ्यासह वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर मंगळवार दिनांक 18/4/2023 पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असुन यावेळी कायदा व सुव्यवस्था याची जबाबदारी प्रशासनाची राहील अशा आशयाचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना तहसील कार्यालय मार्फत वचिंत बहूजन आघाडी ने दिलेे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संघपाल कांबळे ,जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग निकोडे ,रा.वी.नगराळे प्रवक्ते वंचित बहुजन आघाडी संदीप सुरपाम आदिवासी युवा आघाडी विजय नग्नूरवार कुंभार समाज संघटना दिनकर मानकर सामाजिक कार्यकर्ता मंगेश धुर्वे ग्रामपंचायत सदस्य गणेश राठोड अध्यक्ष गोर बंजारा सेना इत्यादी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी हजर होते.