सामाजिक

भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने  कै.बाळशास्त्री जाभेंकर यांना आंदराजली

Spread the love

 

भंडारा | जिल्हा प्रतिनिधी

*भंडारा:-* मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने भंडारा येथील पत्रकार भवनात भंडारा जिल्हा जेष्ठ पत्रकार शशी वर्मा यांच्या अध्यक्षतेत आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम,सचिव मिंलीद हळवे, उपाध्यक्ष राकेश चेटुले, महाराष्ट्र राज्य पत्रकार परीषद जिल्हा प्रमुख डॉ.बबन मेश्राम,राजू आगलावे,अजय मेश्राम, संदिप नंदनवार, ललीत बाच्छिल, दीपक रोहणकर, विलास केजरकर, गौरीशंकर कुंभलकर,व जिल्ह्यातील पत्रकार, पदाधिकारी उपस्थित होते.
शशी वर्मा यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी चेतन भैरम यांनी वृत्तपत्र समाजमनाचा आरसा असतो. या जाणिवेतून वृत्तपत्र सृष्टीचा पाया रचणारे, मराठी पत्रकारितेची पायाभरणी करून मराठमोळ्या अस्मितेची उंची वाढवणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलींद हळवे यांनी व संचलन प्रा.बबन मेश्राम तर उपस्थितांचे आभार राजू आगलावे यांनी मानले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close