भ्रष्ट्राचार

शासकीय जमीन कवडीमोल भावात भाजपा आमदाराच्या घशात 

Spread the love

1 रु प्रति चौ.  फूट ने देण्याचा ठराव झाला पारित 

नागपूर  / नवप्रहार डेस्क 

                नागपूर महानगर पालिकेचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. प्रशासकाच्या कार्यकाळात महानगर मालिकेची कोट्यवधी रुपयांची जमीन 1 रु. चौ. फुटाणे भाजपा आमदारांना देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळत आहे. विशेष बाब अशी की महानगर पालिकेच्या अनेक शाळा या भाड्याच्या जागेत चालत असतांना या मोक्याच्या जमिनीबद्दल घेतलेला हा निर्णय संशोधनाचा विषय ठरत आहे.

दोन वर्षांपासून नागपूर महापालिकेची निवडणूक झाली नाही. त्यामुळे येथे प्रशासक राज सुरू आहे. नागरिकांना आपल्या दैनंदिन समस्यांसाठी महापालिका कार्यालयांचे खेटे घालावे लागत आहे. महापालिकेच्या मालकीची कोट्यवधी रुपयांची जागा कवडीमोलात देण्यापूर्वी, याबद्दल प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाने परस्पर निर्णय घेऊन सुमारे ६०० कोटी रुपये किंमतीचे  १८.६५ हे आर भूखंड भाजपच्या आमदाराच्या घशात घातला आहे. महापालिकेने वाठोडा येथील ही जमीन सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी अधिग्रहीत केली होती.

भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावर काम

महापालिकेच्या शाळांचा दर्जा खालावलेला आहे. दर्जा उंचवण्यासाठी कुठलेही प्रयत्न करण्यात येत नाही. मात्र, भाजप नेत्यांच्या शैक्षणिक संस्थांना भूखंड वाटपात अधिक रस घेत आहे. प्रशासन नागरी सुविधांकडे लक्ष देण्याऐवजी भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे दिसून येत आहे. – विकास ठाकरे, काँग्रेसचे आमदार व शहराध्यक्ष

सिम्बायोसिसकडूनही लूट

नागपूर व विदर्भातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सिम्बायोसिस विद्यापीठात निःशुल्क शिक्षण मिळेल अशी आशा होती. या शिक्षण संस्थेसाठी महापालिकेने मौजा वाठोडा येथे भूखंड नाममात्र दरात दिला. मात्र, सिम्बायोसिसमध्ये नागपूर आणि विदर्भातील विद्यार्थ्यांकडूनही लाखो रुपये शिक्षण शुल्काच्या नावावर वसूल केले जात आहे.

सिम्बायोसिसने शिक्षणाचा बाजार मांडला आहे. अशा परिस्थितीत सिम्बायोसिस विद्यापीठाची जमीन महापालिकेने परत घेणे अपेक्षित आहे किंवा बाजारमूल्यानुसार भूखंडाचे शुल्क वसूल करणे अपेक्षित होते. हे न करता पुन्हा कोट्यवधीची जमीन कवडीमोलात खासगी संस्थेला देण्याचा प्रताप केला आहे, असेही विकास ठाकरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close