सामाजिक

दिव्यांगांना रोजगाराचा नावावर राज्य सरकारचा भ्रष्टाचार सवा लाखाच्या फिरत्या वाहनाची पावणेचार लाखांना खरेदी

Spread the love

अपंग नेते अनिस पत्रकार याचा राज्य सरकार वर आरोप

अमरावती दि 13 ( प्रतिनिधी ) – राज्य सरकारने भ्रष्टाचारासाठी दिव्यांगांनाही सोडले नाही . दिव्यांगांसाठी फिरती वाहने खरेदी करण्याच्या नावावर कोट्यवधींचा घपला केला आहे . सव्वा लाख रुपयांचे वाहन चढ्या भावाने पावणेचार लाख रुपयांना विकत घेतले आहे . अशी ६६७ वाहने हरयाणातील कंपनीकडून खरेदी केली गेली आहेत . प्रत्येक वाहनासाठी अडीच लाख रुपये जास्त मोजले गेल्याचे समोर आले आहे . हा भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून वाहने पुरवण्याचा ठेका परराज्यातील कंपनीला देण्याची दक्षताही राज्य सरकारने घेतली .
देण्याचा निर्णय १० जून २०१ ९ रोजी सरकारने घेतला होता . ही वाहने म्हणजे एक चालते फिरते दुकानच आहे . ज्यावर काही उद्योग करून दिव्यांगांना रोजगार मिळेल अशी त्यामागची भावना होती .
राज्य सरकारने त्या निर्णयाचा पुरेपूर गैरफायदा घेतला आहे . दिव्यांगांना हरित ऊर्जेवर चालणारी फिरती वाहने सरकारने खरेदी केली आहेत . ६६७ वाहने पुरवण्याचा ठेका हरयाणातील मॅक ऑटो या कंपनीला देण्यात आला . प्रत्येक वाहनाचा प्रत्यक्ष बाजारभाव सव्वा लाख रुपये आहे , पण राज्य सरकारने प्रत्येक वाहन पावणेचार लाख रुपये मधे विकत घेतले दिव्यांग व्यक्ती स्वावलंबी व्हाव्यात यासाठी लाखो रुपयांना खरेदी केले . यामुळे संशय त्यांना पर्यावरणस्नेही फिरती वाहने विनामूल्य बळावला आहे .
उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते श्री
अंबादास दानवे यानी सुद्य राज्य
सरकारला केली आहे ही वाहन खरेदी संशयास्पद आहे . संपूर्ण प्रक्रिया ही विहित कार्यपद्धतीनुसार पार पाडलेली दिसून येत नाही . मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शंका येते . मर्जीतल्या कंत्राटदाराला कंत्राट देण्यासाठी हा सर्व नियमबाह्य खटाटोप केला आहे . ही शासनाच्या निधीची लूट आहे असा आरोप अपंग जनता दल सामजिक संघटनेचे अध्यक्ष शेख अनिस पत्रकार यानी केला आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close