क्राइम

मुख्याध्यापकच निघाला नराधम 

Spread the love

पीडितेच्या आईला भेटण्याचे नाटक करून अल्पवयीन मुलीवर करत होता बलात्कार 

 कागल / विशेष प्रतिनिधी

आईच्या तब्येतीच्या बहाण्याने आपल्या पूर्वीच्या विद्यार्थिनीच्या घरी जाऊन घरी कोणी नसताना तिला धमकावत तिच्या सोबत जबरदस्ती करणाऱ्या मुख्याध्यापकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

कृष्णा ज्ञानू दाभोळे (वय ५५, रा.ता. कागल) असे संशयिताचे नाव आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असून, तिच्या आईने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर त्याला अटक झाली. न्यायालयाने संशयिताला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पीडित मुलीची आई कोल्‍हापूर शहरात राहण्यास असून, ती काही दिवसांपासून आजारी असल्याने मुलगी कोल्हापुरात परतली होती. यानंतर संशयिताने तिच्या आईच्या तब्येतीची विचारपूस करत संपर्क पुन्हा वाढवला. ऑगस्ट २०२५ मध्ये पीडितेच्या घरी कोणी नसल्याचे पाहून तिच्यावर अत्याचार केला. तसेच त्याच्या मुलाचाही फ्लॅट शहरात असल्याने पुन्हा दोन महिन्यांनी या फ्लॅटमध्ये पीडित मुलीला बोलावून पुन्हा अत्याचार केला.

मुलीच्या वागण्यात झालेला बदल पाहून तिच्या आईने विश्वासात घेत संवाद साधला. यावेळी तिने सर्व प्रकार आईला सांगितला. हे ऐकून आईलाही धक्का बसला. यानंतर दोघींनी पोलिस मुख्यालयात जाऊन महिला कक्षामध्ये तक्रार दिली होती. यानंतर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांनी केल्या.

संशयिताविरोधात बालकांवरील लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध अधिनियम तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनिमांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले. संशयिताला मुरगूड येथून अटक करून आज न्यायालयात उभे करण्यात आले. न्यायालयाने संशयिताला तीन दिवसांची कोठडी सुनावली. अधिक तपास पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील करीत आहेत.

पीडितेच्या वडिलांचे निधन झाले असून आई, एक बहीण अशा तिघीच राहण्यास आहेत. पीडितेची आई आजारी असल्याचे संशयित दाभोळेने हेरले. आधार देण्याचा बहाणा करून त्याने या कुटुंबाशी जवळीक साधली. यानंतर मात्र त्याला शिक्षक म्हणून असलेल्या जबाबदारीचा विसर पडून आपल्याच विद्यार्थिनीला वासनांधतेची शिकार बनवल.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close