सामाजिक

संविधान चौकात सुरु असलेले गोंडगोवारी आंदोलन 5 तारखेला होणार अधिक तीव्र.

Spread the love

#गोंड गोवारी जमातीचा आमरण उपोषणाला स्थानिक आमदार लक्ष देत नाहीत.
वाडी प्र
26 जानेवारी पासून संविधान चौक नागपूरला सुरु असलेल्या आदिवासी गोंड गोवारी जमातीचे आमरण उपोषण सुरु आहे या आंदोलनाला जवळ पास 10 दिवस होत असून स्थानी आमदार खासदार लक्ष देत नसल्याची खंत आदिवासी नेत्यांनी व्यक्त केली आहे.
दवलामेटी हेटी तील गोंड गोवारी समाजातील महिला पुरुष आंदोलन स्थळी पोहचले या प्रसंगी आंदोलन कर्त्यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे गोवारी समाजाचे क्रांतिकारी तिन समाज बांधव गेल्या 11 दिवसा पासून फक्त आणि फक्त गोंड गोवारी समाजाला न्याय मिळावा म्हणून आमरण उपोषण (धरणा)करीत आहेत . दिनांक 05/02/2024 सोमवार सकाळी 11.00 वाजता हे आंदोलन अधिक तीव्र होणार असून गोंड गोवारी समाजातील लोकांनी मोठ्या संख्येने संविधान चौक नागपूर इथे येण्या चे आवाहन यावेळी दवलामेटी हेटी गावातील,विशाल झापरुजी नेवारे राष्ट्रीय सचिव, आदिवासी गोवारी युवा जण विकास मंच, प्रशांत नामदेवजी सोनवाणे यांनी केले आहे.
1985 पूर्वी ज्या प्रमाणे अनुसूचित जमाती चा सवलती मिळत होत्या त्या पुन्हा लागू कराव्या हि मागणी धरून 26 जानेवारी पासून आमरण उपोष्णा वर सचिन चाचाणे, किशोर चौधरी, चंदन कोहरे हे तीन गोंडगोवारी बांधव बसले असून त्यांची प्रकुर्ती अधिक खालावत आहे.
भगवानजी भोंडे आदिवासी गोंड गोवारी समाज नेते तथा गोंदिया – भंडारा जिल्हा प्रभारी (वंचित बहुजन आघाडी ) :- गोंड गोवारी जमातीचा आमरण उपोषणाला स्थानिक आमदार लक्ष देत नसतील तर नागपूर येथील सहा आमदारांचे पुतळे बनवून जाळू.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close