क्राइम

पहिल्याच नजरेत प्रेम आणि जंगलात नेऊन खून 

Spread the love
 

जळगाव / विशेष प्रतिनिधी

                      ४ फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्यातील पद्मालय वनक्षेत्रात आढळलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे गूढ उकळण्यात पोलिसाना यश आले आहे. प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. वास्तविक गुपचूप च्या गाडीवर या दोघात प्रेम सबंध निर्माण झाले होते. पण प्रेयसी तृतीयपंथी आहे हे समजल्यावर मात्र प्रियकराला राग आला होता.आणि यातूनच हे हत्याकांड घडले.

नेमकं प्रकरण काय?

४ फेब्रुवारी रोजी पद्मालय जंगलात एक अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. आरोपीने ओळख पटू नये म्हणून चेहरा आणि छातीचा भाग ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून टाकला होता. घनदाट जंगल, मोबाईल नेटवर्कची अनुपलब्धता आणि मानवी वर्दळ नसल्याने पोलिसांसमोर या मृतदेहाची ओळख पटवण्याचं मोठे आव्हान होतं. पण पोलिसांनी तांत्रिक तपास करत पहूर येथील आरोपी स्वप्निल उर्फ गोलू अशोक पाटील याला अटक केली आहे.

पाणीपुरीच्या गाडीवर झालेली ओळख ठरली जीवघेणी

मिळालेल्या माहितीनुसार, पहूर येथील स्वप्नील उर्फ गोलू अशोक पाटील (वय २१) आणि मयत आकांक्षा उर्फ अजय हेमराज गद्रे यांची ओळख एका पाणीपुरीच्या गाडीवर झाली होती. आकांक्षाच्या सौंदर्यावर स्वप्नील भाळला आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, काही दिवसांनी स्वप्नीलला समजलं की, आकांक्षा ही तरुणी नसून एक तृतीयपंथी आहे.

लग्नाचा तगादा अन् रागाचा भडका

आकांक्षा ही तृतीयपंथी असल्याचे समजल्यानंतर स्वप्नीलच्या मनात राग निर्माण झाला. त्यातच आकांक्षाने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला. या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी स्वप्नीलने या प्रेम कहाणीचा क्रूर अंत करण्याचं ठरवले. त्याने आकांक्षाला फिरायला नेण्याच्या बहाण्याने पद्मालय येथे नेले. तिथे गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर तिला घनदाट जंगलात नेऊन तिची निर्घृण हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकला.

नेलपेंट आणि फॉरेन्सिक रिपोर्टने फिरवली चक्रे

मृतदेहाची अवस्था पाहता ओळख पटणे कठीण होते. मात्र, फॉरेन्सिक तज्ज्ञांनी मृतदेहावरील अळ्यांच्या वाढीवरून मृत्यू ३० किंवा ३१ जानेवारीला झाल्याचे स्पष्ट केले. पोलिसांनी सूक्ष्म निरीक्षण केले असता, मृतदेहाच्या पायाच्या नखांवर ‘मॅजेंटा’ रंगाची नेलपेंट आणि नाकात सोन्याची मुरनी असल्याचे आढळले. याच महत्त्वाच्या धाग्यावरून पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींची माहिती काढली.
आकांक्षा ही तृतीयपंथी असल्याचे समजल्यानंतर स्वप्नीलच्या मनात राग निर्माण झाला. त्यातच आकांक्षाने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला. या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी स्वप्नीलने या प्रेम कहाणीचा क्रूर अंत करण्याचं ठरवले. त्याने आकांक्षाला फिरायला नेण्याच्या बहाण्याने पद्मालय येथे नेले. तिथे गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर तिला घनदाट जंगलात नेऊन तिची निर्घृण हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकला.
गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयाची सुई स्वप्नील पाटीलकडे वळवली. त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. “ती तरुणी नसून तृतीयपंथी असल्याचे समजल्याने आणि लग्नासाठी दबाव टाकत असल्याने मी तिची हत्या केली,” अशी कबुली त्याने दिली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close