शासकीय इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेत कन्नमवार विद्यालयतील विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश
आर्वी,प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी : स्थानिक कन्नमवार विद्यालयातील विद्यार्थ्यांनी चित्रकला ग्रेड परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त केले. कला संचालनाय महाराष्ट्र राज्य मुंबई द्वारा सप्टेंबर 2023 मध्ये शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा घेण्यात आल्या होत्या या मध्ये विद्यार्थी इंटरमिजिएट परीक्षांमध्ये अत्यंत चांगल्या श्रेणी ने पास झाले या परीक्षेमध्ये कु.खुशी निनावे, प्राची खेडकर, मिसबा नेहवाल काजी यांनी “अ”श्रेणी प्राप्त करून गुणवत्ता यादीत महाराष्ट्रातून ७ वा क्रमांक पटकावला, कु.चंचल पाटील,रितिका पाटील, खुशी सरदार,अक्षरा बीजवे,उरज फातिमा,अंशरा महेविश, अरहान नाझीम खान पठाण ,पूर्वेश केने यांनी “ब ” श्रेणी प्राप्त केले तसेच सदोतीस विद्यार्थांना “क” श्रेणी प्राप्त झाले.या यशाचे श्रेय शाळेतील कलाशिक्षक प्रकाश निखारे यांना देतात. कन्नमवार विद्यालया वेतिरिक्त ते दुसऱ्या शाळेत जाऊन मुलांना विनामूल्य मार्गदर्शन करतात,विद्यार्थांच्या यशाबद्दल ग्रामीण विकास संस्थेचे सचिव डॉ,राहुलजी कन्नमवार नव्याने रुजू झालेले मुख्याध्यापक हिराचंद रेवतकर,पर्यवेक्षक कपिल ठाकूर, दिपक ठाणेकर व सर्व शिक्षक शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.