भारतीय जनता पक्ष हा भाडोत्री जनता पक्ष* … उद्धव बाळासाहेन ठाकरे
हजारो शिवसैनिकांची सभास्थळी हजेरी. खासदार भावना गवळी यांना दिल्लीत जाण्यापासून रोखण्याचे आवाहन.
पंतप्रधानाच्या सभेला सत्तेचा गैरुपौयोग करून गर्दी जमवीळ्याची टीका.
कारंजा ता. प्र.
कारंजा..लोकसभाची निवडणूकी ची घोषणा येत्या काही दिवसात होणार असून सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहे याच अनुषागानें दि.13 मार्च दुपारी 12 वाजता कारंजा येथील शेतकरी निवास येथे जण संवाद मेळावा पार पड़ला या मेळाव्यात बोलताना भारतीय जनता पक्षाला आता स्वतःचे असे अस्तित्व राहिलेले नसून राज्यातील शिवसेना राष्टवाडी काँग्रेस, काँग्रेस पक्षाची माणसे फोडून भाडोत्री पक्ष उभा करण्यात आणि आपल्या सभा मोर्चात भाडोत्री माणसे बोलावून यश मिळवीळ्याची छाती बडविणाऱ्या भाजप आता भाडोत्री जनता पक्ष झाला असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कारंजा येथील सभेत जनसमुद्याला संभोतताना केली. यावेळी त्यांनी स्थानिक खासदार भावना गावडी याचा चांगलाच समाचार घेत शिवसेना पक्षाच्या भरोश्यावर झांसी उभी करणाऱ्यानी आता ही मतदारांनी संजय देशमुख याची यवतमाळ वाशीम लोकसभा ही झांसी करण्याचा प्रण केला असल्याने ही माझी झासी असे ओरसून सांगणाऱ्या भावना गवली यांना दिल्लीत जाण्यापासून रोखण्याचे आवाहन केले.सत्तेतील दिल्ली तील हुकूमशहानी शेतकऱ्याचे प्रचंड हाल केले आपल्या न्याय मागण्यासाठी दिल्लीत जाणाऱ्या शेतकऱ्यांना सत्तेच्या मस्तंललेल्या लोकांनी अश्रूधुर लाठी चार्ज करून रोखले आता शेतकऱ्यांनी मोदींना दिल्लीत जाण्यापासून रोखले पाहिजे असे आवाहन केले.यावेळी शेतकरी प्रश्नावर आपल्या सरकारची कर्जमाफी आणि भाजप ची कर्जमाफी याची तुलना करताना त्यांनी केलेल्या अनेक योजनाची माहिती उपास्थिताना दिली तसेच ज्याच्या बापाच्या नावे काही इतिहास नाही त्यांनी बाळासाहेब यांचा फोटो लावून चोरी केली त्यामुळे ज्याचे बापाचे नावे काही इतिहास नाही अशांनी माझा बाप चोरला अशी खोचक टीका केली. यावेळी मंचावर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, वाशीम यवतमाळ लोकसभेचे उमेदवार संजय देशमुख पोहरादेवी येथील सेवालाल महाराज यांचे वारस सुनील महाराज, कॅप्टन प्रशांत सुर्वे, नेर येथील नगराध्यक्ष पवन जयसवाल,जिल्हा अध्यक्ष सुरेश मापारी, डॉ. सुधीर विल्हेकर, गणेश ठाकरे, तालुका प्रमुख सुरडकर पाटील शिवसेना महिला जिल्हा अध्यक्ष प्रिया महाजन शिवसेनेचे जिल्हा परिषद सदह्य पदाधिकारी आदीची उपास्थिती होती शिवसेना काँग्रेस, राष्टवाडी शरद पवार गट,आदीच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे याचे स्वागत केले.सभेच्या यशस्वीतेसाठी पंचायत समितीचे उवसभापती देवानंद देवळे, शहर अध्यक्ष गणेह बाबरे, कामरगावं सर्कल प्रमुख शरद तुमसरे, महेश बांबल, अविनाश दहादोंडे याचे सह तालुका शहर कार्यकारणीच्या पदाधिकारनी प्रयत्न केले.. या संवाद सभेला तालुक्यातील हजारोंच्या संख्येनें शेतकरी व महिलाचा मोठा जण समुदाय उपस्थित होते…