हटके

डॉक्टरांनी सांगितले तीन बाळ , झाले चार पण …..

Spread the love

 प्रतिनिधी / सहारनपूर 

 बाळाची चाहूल हा दाम्पत्याच्या संसारातला सर्वात सुखद क्षण असतो असं म्हणतात. काही दाम्पत्यांना लग्नानंतर लगेच गोड बातमी मिळते, तर काहीजणांना मात्र गोड बातमीसाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते.

                       लग्ना नंतर प्रत्येक दाम्पत्य  स्वप्न पाहतात ते आईवडील होण्याचे. जर कोणाला लग्नाच्या 7 वर्षां पर्यंत अपत्य होत नसेल आणि तिला गरोदर असल्याचे कळाले तर बाळाच्या येण्याची चाहूल लागताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्यातल्या त्यात दाम्पत्याला माहिती पडले की महिलेच्या गर्भात एक दोन नव्हे तर तीन तीन बाळ आहेत. तेव्हा दाम्पत्याच्या तोंडून एकच उद्गार निघतात की देवाने आमचे उशिरा  ऐकले पण झोळीत भरभरून टाकले.

                  दाम्पत्याचा आनंद आणखी द्विगुणित होतो जेव्हा त्यांना कळते की त्यांना तीन ऐवजी चार अपत्य झाले. पण….

एका महिलेनं तर 7 वर्ष आई होण्याची वाट पाहिली. जेव्हा गरोदरपणाची चाहूल लागली तेव्हा तर तिच्या आनंदाला काही पारावारच उरला नाही. आपली प्रार्थना फळाला आली, असंच तिला वाटलं. कारण तिच्या पोटात 1, 2 नाही, तर 3 बाळ असल्याचं तिला कळलं. या बातमीनं तिचे कुटुंबियही प्रचंड खूश झाले. परंतु त्यांचा हा आनंद 7 महिनेही टिकला नाही. महिला आई तर झाली, बाळांना कुशीत घेतलं, मात्र तरीही तिच्या पदरात आयुष्यभराचं दु:ख पडलं.

ही कहाणी आहे सुमित सैनी आणि मीनू सैनीची. 11 नोव्हेंबर 2017 रोजी त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर वर्षभरातच त्यांच्या पदरात एक गोंडस लेक आली. वर्षभर आई-वडिलांना पालकत्त्वाचं सुख देऊन ही पाहुणी देवाघरी गेली. त्यावेळी सुमित, मीनूसह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला वेदना झाल्या. लेकीच्या आठवणीत ते रात्र-रात्रभर रडायचे. परंतु उशिरा का होईना 7 वर्षांनंतर त्यांना पुन्हा एकदा गोड बातमी मिळाली.

मीनू पुन्हा गरोदर राहिल्या तेव्हा त्यांना यावेळी आपल्या गर्भात 3 बाळ वाढत असल्याचं कळलं. तेव्हापासून त्यांचा आनंद जणू गगनात मावेनासा झाला होता. विशेष म्हणजे त्यांची प्रसूती सातव्या महिन्यातच झाली. याहून मोठा चमत्कार म्हणजे सोनोग्राफीत त्यांच्या गर्भात 3 बाळ असल्याचं दिसलं होतं पण त्यांनी जन्म दिला 4 बाळांना, 2 मुलं आणि 2 मुली. मग काय…सुमित आणि मिनूच्या कुटुंबियांना आता काय करावं आणि काय नाही असं झालं. सर्वांनी एकमेकांना मिठ्या मारल्या, उत्साह साजरा केला. परंतु हे सुख अवघ्या 12 तासांसाठीही टिकलं नाही.

4 मुलं झाल्यामुळे घरात अगोदरपासूनच प्रचंड आनंदाचं वातावरण होतं. आता बाळासाठी ज्या ज्या वस्तू घ्यायच्या असतात त्या चारही मुलांसाठी घ्याव्या लागतील अशी स्वप्न त्यांनी रंगवली, मात्र त्यांच्या 4 बाळांपैकी एका लेकीनं 10 तासांतच जीव सोडला, तर मुलाचा 12 तासांत मृत्यू झाला. 2 मुलं वारल्यानं हे कुटुंब पूर्णपणे दु:खात बुडालं. आता 1 मुलगा आणि मुलीवर उपचार सुरू आहेत.

उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या शंकरपुरी कॉलनीतील रहिवासी असलेल्या मीनू सैनी यांनी शस्त्रक्रियेद्वारे 4 बाळांना जन्म दिला होता. वेळेआधीच जन्म झाल्यानं बाळांची पूर्ण वाढ झाली नव्हती ते शारीरिकदृष्ट्या कमकुवत होते. डॉक्टरांनी सांगितलं की, बाळांची प्रकृती सुरुवातीपासूनच नाजूक होती. 4 पैकी 2 बाळांना वाचवता नाही आलं. तर, 2 बाळांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, बाळांचे बाबा सुमित सैनी म्हणाले, आम्ही तब्बल 7 वर्षे गोड बातमीची आतुरतेनं वाट पाहत होतो. देवानं एकदाच 4 मुलांचा आशीर्वाद दिला. मात्र दुर्दैवानं 2 बाळांना आम्ही गमावलं. आता आमचं पूर्ण लक्ष आमच्या 2 बाळांवर आहे. दोघंही सुखरूप राहायला हवी यासाठी आम्ही दिवस-रात्र प्रार्थना करतोय.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close