डॉक्टर ने रुग्णाची जीभ छाटली,प्रकरण दडपण्यासाठी तोंड पट्टीने बंद केले

समस्तीपूर ( बिहार)/ नवप्रहार ब्युरो
डायलिसिस साठी आलेल्या रुग्णावर अपेक्षित उपचार न करता त्याची जीभ चुकून डॉक्टरांकडून कापल्या गेल्याची घटना बिहार च्या समस्तीपूर येथे घडली आहे. हा प्रकार संबंधित डॉक्टर च्या लक्षात आल्यानंतर डॉक्टरने आपलं कृत्य लपवण्यासाठी रुग्णाचं तोंड पट्टीने बंद केलं. रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांवर त्या रुग्णालयाने स्पष्टीकरण देत आरोप फेटाळून लावले आहेत.
यानंतर डॉक्टरने रुग्णाच्या नातेवाईकांना आता तो काही तास जगू शकतो, असं सांगितलं. रुग्णाच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याचं डॉक्टरने रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितलं. हे ऐकून कुटुंबिय रुग्णाला घरी घेऊन गेले, पण दुसऱ्या दिवशी रुग्ण शुद्धीवर आला. जीभ कापली गेल्यामुळे त्याला बोलता येत नव्हतं, म्हणून त्याने दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्याचा इशारा कुटुंबाला केला.
रुग्णाच्या इशाऱ्यानंतर कुटुंब त्याला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन आले, तेव्हा डॉक्टरने केलेल्या कृत्याचा भांडाफोड झाला. रुग्णाच्या दोन्ही किडनी व्यवस्थित असल्याचं तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं. बिहारच्या समस्तीपूर येथील वैष्णवी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवनाथपूर येथील रहिवासी सतनारायण पासवान यांना त्यांच्या कुटुंबीयांनी डायलिसिससाठी वैष्णवी रुग्णालयात आणले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी सत्यनारायण पासवान यांची जीभ कापल्याचा आरोप आहे. जेव्हा त्यांच्या तोंडातून रक्त येऊ लागले तेव्हा डॉक्टरांनी त्याचे तोंड पट्टीने बंद केले. यानंतर, डॉक्टरने कुटुंबातील सदस्यांना सांगितलं की सत्यनारायण यांची दोन्ही मूत्रपिंडे फुटली आहेत आणि त्यांची प्रकृती गंभीर आहे. सत्यनारायण आता काही तासच जिवंत राहू शकतात.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, कुटुंबाने सत्यनारायण यांना घरी आणले. यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा सत्यनारायण शुद्धीवर आला तेव्हा त्यांनी आपल्याला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचे संकेत दिले. दुसऱ्या रुग्णालयात दाखल केल्यावर सत्यनारायण यांची जीभ कापल्याचे आढळले. तसंच, त्यांच्या दोन्ही किडन्या पूर्णपणे ठीक होत्या. या संपूर्ण प्रकरणात सत्यनारायण यांच्या कुटुंबाचे आतापर्यंत लाखो रुपये खर्च झाले आहेत.
रुग्णालयाने आरोप फेटाळले
दरम्यान वैष्णवी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. आमचे रुग्णालय ऑपरेशन करत नाही आणि डायलिसिसवर उपचारही करत नाही. आमच्या रुग्णालयात असा कोणताही रुग्ण आलेला नाही. पासवान कुटुंबाने केलेले आरोप निराधार आहेत. आमच्या रुग्णालयात सीसीटीव्ही बसवले आहेत, त्यामुळे तपास यंत्रणा याची चौकशी करू शकतात, असं स्पष्टीकरण वैष्णवी रुग्णालयाने दिलं आहे.