सामाजिक
Related Articles
Check Also
Close
अनेक वेळा वन्य प्राणी रस्त्यावर आल्याने किंवा त्यांनी शहरात प्रवेश केल्याने अपघात घडत असतात. त्यात कधी प्राण्यांच्या तर कधी मनुष्याच्या जीवाला धोका निर्माण होतो.अथवा ते जखमी होतात. या घटनेचे व्हिडीओ काही वेळा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये भर रस्त्यात एक हरीण एका दुचाकीला जाऊन धडकताना दिसते. त्यानंतर जे काही होते ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. रस्त्यावर अनेकदा प्राणी आडवे येतात ज्यामुळे अनेकदा अपघात घडतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. ही संपूर्ण घटना एका मेडिकल दुकानातील सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका मेडिकल दुकानाच्या समोर एक दुचाकी उभी आहे. या दुचाकीवर एक व्यक्ती दोन चिमुकल्या मुलांसह बसलेला दिसत आहे. अचानक या मागून हरीण येते आणि दुचाकीला धडकते. तेव्हा दुचाकी चालक दुचाकी पुढे सरकवतो. सुदैवाने हरिणला कोणतीही दुखापत होत नाही पण पुढे जे काही होतं ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. हरीण अचानक जागेवरुन उठते आणि थेट समोरच्या मेडिकलमध्ये उडी मारताना दिसते. हरिण ज्या वेगाने दुकानात उडी मारते ते पाहून दुकान मालक घाबरुन मेडिकलमधून बाहेर पडताना दिसतो. हा धक्कादायक व्हिडीओ पाहून काही क्षणासाठी तुमच्याही अंगावर काटा येईल.
Videos You Need To See या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘एक हरीण दुचाकीला धडकले आणि त्यानंतर मेडिकल दुकानात उडी मारली.’ या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, ‘प्रत्येक ठिकाणी धोका आहे’ तर एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, ‘हरिणला मेडिकल मदतीची आवश्यकता होती.’ आणखी एका युजरने लिहिलेय, ‘धक्कादायक व्हिडीओ’ अनेक युजर्सनी या व्हिडीओत दाखवलेला प्राणी हरीण नसल्याचा दावा केला आहे. काही युजरर्सना ती गाय दिसत आहे तर काही लोकांना गाढव दिसत आहे.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |