क्राइम

पुन्हा गोळीबाराच्या घटनेने शहर हादरले 

Spread the love

पुणे / प्रतिनिधी 

                     मागील काही दिवसात क्राईम सिटी म्हणून ओळख निर्माण होत असलेल्या पुणे शहरात पुन्हा गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. इंदापूर पाठोपाठ चाकण मध्ये ही घटना घडली आहे. लागोपाठ घडणाऱ्या या घटनेने नागरिक केव्हा काय होईल याचा नेम नसल्याने दहशती खाली वावरत आहेत. हॉटेल व्यवसायावर देखील अश्या घटनेचा परिणाम पाहायला मिळत आहे. 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, चाकण शहरापासून काही अंतरावर असलेल्या रासे फाटा परिसरात हॉटेल मराठा नावाचं एक हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली आहे. तीन आरोपींनी जिवे मारण्याच्या उद्देशाने हॉटेलमध्ये बसलेल्या स्वप्नील संजय शिंदे उर्फ सोप्या शिंदेवर गोळीबार केला आणि धारदार शस्त्राने वार देखील केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत सोप्या शिंदे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. राहुल पवार, अजय गायकवाड व एका अज्ञात आरोपीने हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close