राजकिय

पहा कोणी म्हटले  ! अजित पवार यांच्या सोबत गेलेले आमदार निलंबित होणार 

Spread the love

मुंबई / नवप्रहार मीडिया नेटवर्क

               राष्ट्रवादीचा एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्याच्या शिंदे- फडणवीस सरकारचा एक भाग झाला आहे. संख्याबळ आमच्याच कडे असल्याचा दावा काका आणि पुतण्याचे गट करीत आहे. अश्यातच  काँग्रेस च्या एका नेत्याने अजित पवार हे खोटे बोलत असून त्यांच्याकडे एक तृतीयांश आमदार नाहीत. आणि त्यामुळे अजित दादा सोबत गेलेले आमदार अपात्र ठरतील असा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

अजित पवार यांच्याकडे शरद पवार यांच्यापेक्षा जास्त आमदार असल्याचे बोलले जात आहे. मात्र चव्हाण यांनी हा आकडा फेटाळून लावला आहे. अजित पवार यांच्याकडे दोन-तृतीयांशासाठी आवश्यक असणारे 36 आमदार नाहीत त्यामुळे पक्षांतर कायद्यानुसार ते निलंबीत होणार, असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर गटाकडे सर्वाधिक आमदार नाहीत. त्यांच्या गटात 36 आमदार दिसले नाहीत. त्यांच्याकडे 36 आमदार असते तर त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं असतं. त्यांचा फोटा काढला असता. त्यामुळे त्यांच्याकडे दोन-तृतीयांश आमदार नसतील, तर महाराष्ट्रात आणखी एक मोठा राजकीय भूकंप होईल. ज्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, ते सर्व आमदार निलंबित होतील. त्यांचं सदस्यत्व रद्द होईल. सदस्यत्व रद्द झाल्यानंतर संबंधित आमदारांना विद्यमान विधीमंडळात मंत्री होता येणार नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. याचा निर्णय ‘हो’ किंवा ‘नाही’, असं झाला पाहिजे. हे आमदार निलंबित होणार नसतील तर त्यांच्याकडील ३६ आमदारांचा आकडा त्यांनी दाखवावा. हा केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्न नाही, हा संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close