रस्ता बांधकामाचे भूमिपूज झाले त्याच रात्री नामफलक झाले गायप. रस्ताच गायप होणार नाही ना?.रहीवासी भागातील नागरिकांत चर्चा.

घाटंजी तालुका प्रतिनिधी-सचिन कर्णेवार
घाटंजी-गेल्या दोन पंचवार्षिक पासून खरतड अवस्थेत असलेला नेहरु नगर येथिल रस्ता बांधकामांचे बऱ्याच प्रतिक्षे नंतर दी.२०/११/२३ रोजी नगर विकास निधी अंतर्गत १० लक्ष रु च्या निधीत क्रॉक्रेट रस्ता बांधकामास फाजलाणी ते रामटेके यांचे घरापर्यंत रस्ता भुमिपूजन मुहूर्त सापडला व रस्ता बांधकाम उद्घाटन अनेक मान्यवर व नगर सेवक यांच्या उपस्थित मोठ्या थाटात झाला ही पण, रस्ता बांधकामाचे भूमिपूजन समारंभ झाले ते नामफलक त्याच रात्री पासून अच्यानक गायब झाले त्यामुळे रहिवासी नागरिक व ईतरही नेहरू नगर रहीवासी यांच्या मनात रस्ता पुर्णत्वास जाई पर्यंत संभ्रम निर्माण झाला असून त्या नाम फलका प्रमाणे रस्ता पण गायब होणार नाही ना? असी चर्चा नागरिकांचे बोलण्यातून येत आहे. रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले व गायप झालेले नामफलक शोधून काढले वरच या प्रकरणाचा पुर्णविराम मिळेल हे मात्र नक्की.