हटके

प्रेयसी ने प्रियकराला घरी कोणी नाही म्हणून बोलावले अन….. 

Spread the love
..

                 प्रेम जी हवीहवीशी वाटणारी गोष्ट आहे. मनुष्य एकदा प्रेमात पडला की मग त्याला आपल्या अवतीभवती काय सुरू आहे याच्याशी काही घेणेंदेणे नसते. प्रेमी युगल आपल्या जगात खुश असतात. सोबतच ते भेटीगाठी चे कारण सुद्धा शोधत असतात. त्यासाठी ते काही न काही कारण शोधत असतात. कुटुंबीय घरी नसल्याने आपल्या प्रियकराला घरी बोलावले.पण…..

पोलिसांनी सांगितले की, सुमन कुमार (21) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याचे एका मुलीवर प्रेम होते. सुमन कुमार एका लग्न समारंभात गेला होता, याठिकाणी त्याच्या प्रेयसीचे कुटुंबीयही गेले होते.

दरम्यान, त्याच्या प्रेयसीने त्याला फोन करून भेटायला बोलवले. यात विशषेतः घरी कोणी नाहीय, असे म्हणून प्रेयसीने आपल्या प्रियकराला आपल्या घरी बोलावले.

अन् क्षणात होत्याचं नव्हतं

शेजारच्याने प्रियकर सुमनला प्रेयसीच्या घरात शिरताना पाहिले, त्याने मुलीच्या वडिलांना माहिती दीली. मुलीच्या वडिलांनी आधी घरातून बाहेर पडण्याचा मार्ग बंद केला आणि मुलीला दार उघडायला लावले. प्रियकर सुमन निघून जात असतानाच त्याला पडकले, दोरीने बांधून त्याला जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत प्रियकर सुमन बेशुद्ध झाला. नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती मृत घोषित केले, त्यामुळे प्रेयसीची ही भेट त्याच्यासाठी शेवटची ठरली.

या प्रकरणी पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतली आहे. बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील कुर्सेला पोलीस ठाण्याच्या डुमरिया गावात ही घटना घडली असून, पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close