क्राइम

विद्यार्थिनींवर बलात्कार करून हत्या करणारा आरोपी निघाला सिरीयल किलर 

Spread the love

विद्यार्थिनीच्या  मृतदेहा सॊबत केला दोनदा बलात्कार 

वळसाड / नवप्रहार डेस्क 

            ट्युशन वरुन घरी परतणाऱ्या 19 वर्षीय बिद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या करणारा आरोपी सिरीयल किलर असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे या किलर ने विद्यार्थिनीची हत्या केल्या नंतर तिच्या मृतदेहावर दोन वेळा बलात्कार केला. पोलिसांच्या अथक प्रयत्ना नंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. तपासात तो सिरीयल किलर असल्याची बाब समोर आली असून त्याने त्याची कबुली दिली आहे.

25 दिवसांतच त्याने 4 आणखी हत्या केल्याची कबुली दिली आहे. यातील एक हत्या त्याने सोलापूरमध्ये केली होती. गुजरात पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केल्यानंतर 5 डिसेंबरपर्यंत रिमांडमध्ये घेतलं आहे. राहुल असं या आरोपीचं नाव असून चौकशीत आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घ्या.

पीडितेवर हत्या केल्यानंतरही बलात्कार

वलसाडच्या पारडी तालुक्यातील मोतीवाला परिसरात राहणारी बीकॉमची दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी ट्यूशनवरून घरी परतत होती. दरम्यान, निर्मनुष्य भागातून जात असताना आरोपीने तिला झुडपात ओढून नेलं . तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर गळा दाबून हत्या केली. एवढंच नाही तर आरोपी दोन तासांनी घटनास्थळी परतला होता. येथे त्याने विद्यार्थिनीच्या मृतदेहावर दोनदा बलात्कार केला. काही लोक येत असल्याचा आवाज ऐकताच तो घाईघाईने आपला टी-शर्ट व बॅग तिथे सोडून पळून गेला होता.

CCTV त विद्यार्थिनी झाली होती कैद

पीडित विद्यार्थिनी संध्याकाळी उशीर झाला तरी घरी पोहोचली नव्हती. यानंतर कुटुंबाने तिचा शोध सुरु केला होता. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर दोन पथकं तयार करुन शोध सुरु करण्यात आला. एका सीसीटीव्हीत विद्यार्थिनी घरी जाताना कैद झाली होती, पण रस्त्यातूनच ती गायब झाली होती.

यामुळे पोलिसांनी रेल्वे ट्रॅकजवळी परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री उशिरा मोतीवाला फाटकाजवळ तिचा मृतदेह आढळला. शवविच्छेदन अहवालात, बलात्कार आणि त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केल्याचं उघड झालं.

10 पथकं, 200 सीसीटीव्हींची तपासणी

पारडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर वलसाड जिल्ह्याचे तीन डेप्युटी एसपींच्या नेतृत्वात एलसीबी, एसओजी क्राइम ब्रांचसह पोलिसांच्या एकूण 10 पथकांनी तपास सुरु केला होता. पीडितेवजळ सापडलेलं टी-शर्ट आणि बॅग हा मुख्य पुरावा त्यांच्याकडे होता.

बॅग आणि टी-शर्टमुळे आरोपी पकडला गेला

रेल्वे रुळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता पार्किंग कॅमेऱ्यात तोच टी-शर्ट घातलेला आणि तीच बॅग घेऊन जाणारी एक व्यक्ती दिसली. यानंतर आरोपीचे फुटेज गुजरातच्या सर्व रेल्वे स्थानकांच्या पोलिसांना पाठवण्यात आलं. या काळात दोन हजारांहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची छाननी करण्यात आली. तपासादरम्यानच पोलिसांना चोरीच्या घटनेत आरोपी सुरतच्या लाजपोर कारागृहात बंद होता अशी माहिती मिळाली. मे महिन्यातच त्याची जामिनावर सुटका झाली होती.

लाजपूर कारागृहातील काही कैद्यांनीही त्याची ओळख पटवली. तपासात आरोपी हा मूळचा हरियाणातील रोहतक येथील रहिवासी असल्याचे समोर आलं. पोलिसांचं एक पथक रोहतकलाही पाठवण्यात आलं. परंतु आरोपी अनेक वर्षांपासून हरियाणात गेला नसल्याचं आढळून आलं. अनेक वर्षांपूर्वी चोरीच्या घटनांमुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याला घरातून हाकलून दिलं होते. त्याच्या वडिलांचं निधन झालं आहे.

ट्रेनमध्ये फिरत करायचा गुन्हा

तपास पथकांना आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती मिळाली. यासह तो ट्रेनमधून फिरत सर्व गुन्हे करत असल्याची माहिती मिळालीय त्यामुळे वलसाड एसपींनी आरपीएफ आणि जीआरपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून संयुक्त कारवाई सुरू केली.

या कारवाईत गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, ओडिशा, आंध्र प्रदेश या राज्यांतील पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला आणि सोशल मीडिया ग्रुपमध्ये प्रत्येक छोटी माहितीही शेअर करण्यात आली. याचा फायदा असा झाला की आरोपी वापी रेल्वे स्थानकावर पोहोचताच घटनेच्या 11व्या दिवशी (24 नोव्हेंबर) त्याला पोलिसांनी अटक केली.

तपासात उघड झालं की, आरोपीने वापी शहरातील एका ढाब्यावर नोकरी केली आहे. घटनेच्या दिवशी तो ढाब्याच्या मालकाकडून पैसे घेण्यासाठी वापीला आला होता. परत जाण्यासाठी तो वलसाड स्थानकावर बसलेला असतानाच त्यानी नजर शिकवणीवरुन एकटी घरी निघालेल्या विद्यार्थिनीवर पडली. त्याने तिचा पाठलाग सुरु केला. मुलगी निर्जनस्थळी पोहोचताच त्याने मागून जाऊन तिचं तोंड बंद केलं आणि झाडीत ओढून नेलं. तिथे बलात्कार केल्यानंतर त्याने तिची हत्या केली.

25 दिवसांत दिली 5 खून केल्याची कबुली

या घटनेच्या एक दिवस अगोदर तेलंगणातील सिकंदराबाद येथे दरोड्याच्या वेळी एका महिलेची हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे. याआधी ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील सोलापूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेत त्याने एका महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. ऑक्टोबरमध्ये पश्चिम बंगालमधील हावडा स्टेशनजवळ एका वृद्धाची चाकूने वार करून हत्या केली. ऑक्टोबरमध्येच त्याने कर्नाटकातील मुल्की स्टेशनवर एका प्रवाशाला विडी न देण्याच्या क्षुल्लक कारणावरून भोसकून हत्या केली होती.

आरोपीला 5 दिवसांची रिमांड

वलसाडचे एसपी करणराज बघेला यांनी आरोपीच्या बोलण्यातून आणि वागण्यावरून तो खूपच चालाख असल्याचं दिसत असल्याचं सांगितलं आहे. त्याच्या चौकशीत आणखी काही न उलगडलेले गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणी वलसाड पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर करून पुढील चौकशीसाठी 45 डिसेंबरपर्यंत ताब्यात घेतलं आहे.

चौकशीत आरोपी चोरी, दरोड्याचे गुन्हे करत असल्याचे उघड झाले. त्याच्यावर विविध राज्यात 13 चोरीचे गुन्हे दाखल आहेत. विशेषत: रात्रीच्या वेळी तो ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू तो चोरत होता. आरोपीला अटक केली तेव्हा त्याने 10 हजार रुपये किमतीचे विदेशी बूट घातले होते. हे शूजही त्याने ट्रेनमधून चोरले होते. ट्रकमधून तेल आणि अवैध शस्त्रे चोरल्याप्रकरणी राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही तो तुरुंगात गेला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close