राजकिय

ते काही  एकायलाच तयार नव्हते – एकनाथ शिंदे 

Spread the love

मुंबई / नवप्रहार डेस्क 

                   40 आमदारांना घेऊन सेनेतून बाहेर पडलेल्या  एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांच्या मदतीने राज्यात सएकार स्थापन केले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले आणि त्यांचे मुख्यमंत्री पदही गेले.त्यानंतर शिंदे यांच्यावर आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून गद्दार असे संबोधन देण्यात आले. यावर एका वृत्तवाहिनीने लोकसभेच्या बिजी शेड्युल मधून वेळ घेत त्यांची मुलाकात घेतली. यावेळी शिंदे यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली.

तुम्हाला ‘गद्दार’ म्हटल्यावर काय वाटतं, बाळासाहेबांचे खरे दावेदार कोण, तुरुंगात जाण्याचा किंवा भाजपमध्ये जाणे’ यापैकी पर्याय देण्यात आला होता का? या प्रश्नांवर त्यानी स्पष्टपणे उत्तरे दिली. टाईम्स नाऊच्या ग्रुप एडिटर-इन-चीफ नविका कुमार यांनी तुम्ही तुमचे विचार उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता का? तुम्ही समोरासमोर बोललात का? असा प्रश्न विचारला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अगदी, आम्ही समोरासमोर बोललो. मी म्हणालो होतो की ही (काँग्रेससोबतची युती) आपल्या आमदारांना नको आहे, ती आपली विचारधारा नाही. आपली (काँग्रेस आणि शिवसेना) विचारसरणी वेगळी आहे. शिवसेना आणि भाजपची विचारसरणी एकच आहे. ही आपली नैसर्गिक युती आहे. ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन यांनी आघाडी स्थापन केली होती, त्यानुसारच सरकार स्थापन व्हायला हवे असे मी त्यांना सांगितले होते.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरे म्हणाले होते की मी भाजपसोबत जाणार नाही. ते म्हणाले की भाजपने त्यांना 2.5 वर्षांचे वचन दिले होते. मी त्यांना भाजपशी बोलायला सांगितले. परंतु त्यांनी भाजपवर आता विश्वास नसल्याने त्यांच्याशी चर्चा करणार नसल्याचे सांगितले. तसेच 2.5 वर्षे द्यायची असतील तर पहिली 2.5 वर्षे त्यांना हवी होती. माझा त्यांच्यावर (भाजप) विश्वास नाही, असे ते म्हणाले होते. देवेंद्रजींनी त्यांना 50 वेळा फोन केला. तुम्हाला 2.5 वर्षे हवी असतील तर तुम्ही ते बोलायला हवे होते. मी खूप प्रयत्न केला पण त्यांनी ऐकले नाही, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

यानंतर नविका कुमार यांनी प्रतिप्रश्न करताना विचारले की, तरीही तुम्ही 3 वर्षे गप्प राहिलात? त्यावर बोलताना शिंदे म्हणाले, त्यांनी आपला निर्णय घेतला होता. सर्व काही नियोजित होते. ज्या दिवशी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, त्यादिवशी एक साधे विधानही जारी करण्यात आले की, त्यांच्यासाठी सर्व दरवाजे खुले आहेत. या विधानाचा अर्थ काय? ते काँग्रेस आणि शरद पवार यांच्याशी युती करतील असे मला कधीच वाटले नव्हते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close