अन् तो रस्त्यावर वाघाला घेऊन फिरला ना राव…..!
इंस्टाग्राम,फेसबुक सारख्या सोशल मीडियावर प्रसिध्दी मिळवण्यासाठी अनेक लोक प्रयत्नांत असतात. त्यासाठी ते रील बनवून ती व्हायरल करतात. काहींना यात जनता लाईक करते तर काही रिल्स बनविणाऱ्याना नेटकऱ्यांकडून ट्रोल देखील व्हावे लागते. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओ ने नेटकऱ्यांचा संताप पाहायला मिळत आहे. यात एक युवक वाघाला साखळीने बांधून रस्त्यावर फिरताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाकिस्तान मधील आहे. मात्र रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांच्या आवाजामुळे वाघ अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात एक तरुण वाघाला घेऊन रहदारीच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. तसेच हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यावर अनेक जण संताप व्यक्त करताना दिसून आले आहेत.
व्हायरल व्हिडीओ पाकिस्तानचा आहे. पाकिस्तानमध्ये रस्त्याच्या कडेला एक तरुण चालताना दिसत आहे आणि त्याच्याबरोबर वाघसुद्धा आहे. हा तरुण वाघाला साखळी बांधून अगदी बिनधास्तपणे रस्त्यावरून फिरताना दिसतो आहे. पण, रस्त्यावरील वाहने आणि माणसे पाहून वाघदेखील अस्वस्थ होऊन बांधलेल्या साखळीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पाकिस्तानच्या रस्त्यावर वाघाला घेऊन फिरणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघाच…
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, पाकिस्तानमध्ये रस्त्याच्या कडेला एक माणूस वाघाबरोबर चालताना दिसत आहे. व्हिडीओत मागच्या बाजूला बँक ऑफ खैबर (Bank of Khyber) दिसून आली आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाकिस्तानचा आहे, असे सांगण्यात येत आहे. रस्त्यावरून वाहने ये-जा करीत आहेत. त्यादरम्यान एका धावत्या गाडीवर वाघ उडी घेत हल्ला करण्याचा प्रयत्न करतो आहे; जे अनेक प्रवासी आणि नागरिकांसाठी धोकादायक आहे हे स्पष्ट दिसून येतेय. पण, वाघाला बिनधास्त घेऊन फिरणाऱ्या माणसाला याची पर्वा नाही हे व्हिडीओत तुम्हाला दिसेल.
सोशल मीडियावर हा व्हायरल झालेला व्हिडीओ @tiptopyatra या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून अनेक जण यावर हसताना; तर काही जण संताप व्यक्त करताना दिसत आहेत. एक युजर, या माणसानं फक्त प्रसिद्ध होण्यासाठी हे कृत्य केलं असावं बहुतेक, असा अंदाज कमेंटमध्ये व्यक्त केला आहे.