त्या तरुणीची हत्या दिरांनी केल्याचे उघड

फतेहपूर / नवप्रहार वृत्तसेवा
एका इमारतीच्या सेफ्टी टॅंक मध्ये विवस्त्र स्थितीत आढळलेल्या तरुणीचा मृतदेह हा मूळची गाझीपुर ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या आणि राधानगर इथं विवाह झालेल्या तरुणीचा असल्याचे उघड झाले आहे.तिचा नवरा दुबईत नोकरी करत असून तिच्या दिरांनी तिला यात्रेत फिरणाच्या बहाण्याने नेले होते.आणि नंतर तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
या प्रकरणी तिघांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तरुणीला यात्रेत फिरवण्याच्या बहाण्याने तिचे दोन दिर घेऊन गेले होते. तीन दिवस फिरवल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि अत्याचारानंतर तिची हत्या केली गेली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गाझीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तरुणीचं एप्रिल २०२२ मध्ये राधानगर इथल्या एका तरुणाशी लग्न झालं होतं. तरुणीचा पती दुबईत नोकरी करतो. तर तरुणी बऱ्याचदा तिच्या माहेरी रहायला असायची. १५ जानेवारीला ती शेतातूनच यात्रेत फिरायला गेली होती. तेव्हापासून ती बेपत्ता होती. मात्र शनिवारी सकाळी तिचा मृतदेह एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीबाहेर सेफ्टी टँकमध्ये आढळला होता.
मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच तरुणीचे कुटुंबिय पोस्टमार्टम हाउसला पोहोचले. कपडे आणि दागिन्यांवरून तिची ओळख पटली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी सांगितले की, मुलीला नेण्यासाठी तिच्या चुलत दिरांसह तिघे आले होते. मुलगी शेतात काम करत असताना तिला बोलावून नेलं होतं.
फतेहपूर जिल्ह्यात एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा संशय आहे. त्यानंतर तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. तिचे केस इमारतीत पायऱ्यांवर पडले होते. तसंच ज्या सेफ्टी टँकमध्ये तिचा मृतदेह आढळला त्याच्या बाजूला हातातील फुटलेल्या बांगड्या आढळल्या.
घटनास्थळी जमिनीवर अंथरलेली कांबळ आणि तिची साडीही सापडली आहे. पहिल्या मजल्यावर रक्ताने माखलेल्या दोन विटा, अर्धवट खाल्लेला समोसा आणि सहा समोसे एखा पिशवीत मिळाले. पायऱ्यांवरही रक्ताचे डाग होते. आरोपींनी खालच्या मजल्यावर तिच्यावर अत्याचार केले असावे आणि वरच्या मजल्यावर नेले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तरुणीचा चेहरा विटांनी ठेचण्यात आला होता. पोलीस आता या प्रकरणी अधिक तपास करत असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.