तहसीलदाराची अवैध रेती विरोधात कारवाई ; दोन ट्रक पकडले
मोहाडी./ प्रतिनिधी
मोहाडी तालुक्यातील अनेक रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत असून तहसीलदार दीपक कारंडे वाहनांना पकडून करोडोचा दंड वसूल केला आहे. दि १५ मार्च रोजी दोन ट्रॅक पकडून पोलीस स्टेशन मोहाडी येथे जमा केले आहे.
मोहाडी तालुक्यातून वैनगंगा व सुर नदी वाहते या नदीत मोठ्या प्रमाणात रेती साठा उपलब्ध असून रोहा बेटाला पांजरा (बोथली) मोहोगाव (देवी) देव्हाडा(बूज व खुर्द) निलज (बूज) मुंढरी(बूज) कान्हलगाव ढीवरवाडा या घाटावरून मोठ्या प्रमाणात रेती चोरी होते पण यावर आवर घालण्यासाठी तहसीलदार दीपक कारंडे व उपविभागीय अधिकारी बी विस्नोई व त्यांचे काही निवडक कर्मचारी या चोरांवर कारवाही करतात पण यातील काही कर्मचारी व पोलीस विभाग हप्ता वसूल करण्यात वेस्त्त आहेत.त्या मुळे रेती चोर मग्रावले आहेत.
दि.१५ मार्च रोजी सकाळी सहाच्या सुमारास तहसीलदार दीपक कारंडे व त्यांच्या चमूने रेती भरलेले ट्रॅक क्र.M.H.३६.AA.१२१३ व M.H.४९.०१३० यास वरठी जवळ पकडून पोलीस स्टेशन मोहाडी येथे जमा केले.
तसेच दि.१४ मार्च रोजी करडी पोलीस स्टेशनचे शीपाई संजय मालाधरे यांनी ढीवरवाडा(मांडवी) येथे नदीत ट्रॅक्टर क्र.M.H.३६ L २९२० पकडून तलाठी कांबळे व घोडेस्वार यांच्या स्वाधीन केले व तो ट्रॅक्टर पोलीस स्टेशन करडी येथे जमा करण्यात आला आहे.