बाभुळगाव येतील दागिने चोरीचा छडा, चार लाख 82000 चा मुद्देमाल जप्त
बाभुळगाव / प्रतीनिधी
बाबुळगाव तालुक्यातील खडक सावंगा येथील दागिने चोरीची घटना घडली होती,एलसीबी आणि बाबुळगाव पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावून दोन महिलांसह अल्पवयीन मुलास अटक केली तसेच त्यांच्याकडून 482000 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुर्गा बेन लालजी ठाकूर (36), रेणुका बेन रमेश पटेल (20) दोघेही राहणार बांगर नगर यवतमाळ, एक अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेण्यात आले खडक सावंगा येथील भगवान आनंद ठाकरे हे मोहरम च्या कामाकरिता बाहेरगावी गेले होते.त्यांची पत्नी घरी एकटीच होती यावेळी पाणी पिण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरात घुसून दागिने लंपास केले यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला, सीसीटीव्ही फुटेज त्या माध्यमातून आरोपींना अटक करण्यात आली व त्यांच्याकडून मुद्देमाल सह एक मोबाईल, एक मोपेड असा एकूण 482000 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाही सुरु आहें.