क्राइम

तहसील पोलिसांची अवैध पशुधन आणि गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई

Spread the love

तहसिल पोलीसांची कामगिरी : कत्तली साठी जाणाऱ्या ५ गोवंशीय जनावरे सोडवली : व दुसऱ्या कारवाईत २०० लिटर मोहाफुलाची गावठी दारू किमती अंदा ३०,००० /- रू जप्त केली

तहसिल पोलीस हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना मिळालेले खात्रीशीर माहिती वरून अंसार नगर डोबी वस्ती येथे राहणारा अयुब कुरैशी नावाचा इसम यांनी आपले घराचे बाजुला एका रूममध्ये काही गोवंशीय जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधुन ठेवले आहे… अशी माहीती वरून सोबत स्टाफ असे घटनास्थळी गेले असता गल्लीमध्ये एका रूम मध्ये एकूण ०५ गोवंशीय जनावरे बांधलेली दिसून आली. लागलीच समोरील असलेल्या घराचे दरवाज्याजवळ जावुन आवाज दिला असता यातील आरोपी नामे अयुब कुरैशी वल्द असलम कुरैशी वय ३० वर्ष रा. डोबी बस्ती अंसार नगर मोमीनपुरा पो स्टे तहसील नागपुर यास त्याचे घराचे बाजूला असलेली रूम व पोलीसांना मिळून आलेली गोवंशीय जनावराची रूम कोणाची आहे व गोवंशीय जनावर कोणाचे आहे तसेच ते जनावरे कशाकरीता आणलेले आहे असे विचारले असता त्याने सदरची रूम माझी आहे व ती जनावर कत्तली करीता कळमना बाजारातुन विकत घेतली असल्याचे सांगितले. याबाबत त्यास गोवंशीय जानावरे विकत घेतल्याची पावती दाखव म्हटले असता त्याने पावती नसल्याचे पोलीसांना सांगितल्याने गोवंशीय जनावरे ताब्यात घेउन सुरक्षेच्या दृष्टीने महानगरपालिकेचे वाहन बोलावून गोशाळा येथे दाखल करण्यात आले. सदर आरोपीचे कृत्य महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियम कलम ५, ५(अ), ५ ( ब ) ९ प्रमाणे गुन्हा होत असल्याने सदर चा गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्यात आली.

तहसिल पोलीस हे पोलीस ठाणे हद्दीत सोबत स्टाफसह पो.स्टे. हद्दीत कोम्बींग ऑपरेशन दरम्यान पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून, यातील नमुद आरोपी क्र १) निलेश उर्फ बंटी टेभुर्णे वय ४२ वर्ष रा. प्लॉट न. ८४, भानखेडा, तहसिल नागपूर याचे ताब्यातून २०० लिटर मोहाफुलाची गावठी दारू किमती अंदा ३०,००० /- रू ची मिळुन आल्याने ते पंचासमक्ष घटनास्थळीवर जप्त करण्यात आले सदर मोहाफुलाचे गावठी दारू चे साठयाबाबत त्यास विचारले असता त्याने सदर मुद्देमाल हा दारू विकणारा चरण गौर याचा आहे. यातील आरोपीचे हे कृत्य कलम ६५ (ई) म.दा. का अन्वये होत असल्याने आरोपी विरूध्द कारवाई करण्यात आली.

सदर कामगिरी मा पोलीस उप आयुक्त श्री गोरख भामरे, परिमंडळ क्र ०३ नागपुर शहर, सहायक पोलीस आयुक्त साहेब श्री संजय सुर्वे, कोतवाली विभाग, नागपूर यांचे मार्गदर्शनात, वपोनि अनिरूध्द पुरी, दुपोनि. विनायक गोल्हे, सपोनि. संदीप बागुल, पोउपनि प्रविण सुरकर, पोहवा. संजय साहु, नापोशी. संदीप गवळी, पोशि. कुणाल कोरचे, ओकार राठोड यांनी केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close