आस्था केन्द्र महिला विकास आर्थिक महामंडळ यांचा तर्फ सार्वित्रीबाई फुले यांची जयंती धम्मकीर्ती बुद्ध विहारात साजरी!
वाडी / नागेश बोरकर
दिनांक 16 जाने ला लोक संचालित आस्था केन्द्र महिला विकास आर्थिक महामंडळ यांचा तर्फ सार्वित्रीबाई फुले यांची जयंती धम्मकीर्ती नगर येथील बुद्ध विहार वाडीत उत्साहात साजरी करणात आली तसेच समाज सेवक सचिन मेश्राम (डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमानी संघटना स्वयस्थापक अध्यक्ष) यांचा तर्फे मोफत रोग निदान शिबीर लावण्यात आले या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर रिचर्स सेंटर शालिनी ताई मेघे हॉस्पिटल चे डॉक्टर व त्यांचा चमू ने सहकार्य केले. यावेळी 600 लाभार्त्यांना मोफत रुग्ण सेवा देणात आली यामध्ये ईसीजी, बीपी, शुगर व मेडिसीन मोफत देणात आली तसेच या कार्यक्रमात मुख्यउपस्थिती मा.सचिन मेश्राम , मा. सुजाता गावंडे नायब तहलसीदार हिंगणा, मा. नरेंद्र वानखडे पोलीस निरीक्षक विजय धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा एम आय डी सी वाडी, हिंगणा नागपूर शहर अध्यक्ष सुषमा निमसरकार, केशव डोंगरे सामजिक कार्यकर्ता, करुणा मंनगटे, शोभा गेडाम, हंसा मेहर ताई उपस्थित होते. तसेच पूजा बोदिले यांनी संचालन तर आभार प्रदर्शन हंसा मेहरे यांनी केले केले महिला बचत गटाच्या महिला, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.