शाशकीय

तहासिलदारांची गोकुलसरा घाटावर धडक कारवाई  30 ब्रॉस रेती साठा जप्त 

Spread the love
बाजूलाच सुरू असलेल्या अवैध उपस्यावर देखील कारवाईची माफक अपेक्षा 
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी 
                 तहसीलदार यांनी गोकुलसरा घाटावर धडक कारवाई करत नदीपात्रातून उपसण्यात आलेला अवैध 30 ब्रॉस वाळू साठा जप्त केला आहे.
                            गोकुलसरा घाटातून अवैध रित्या उलसण्यात येत असलेल्या वाळू बद्दल माहिती मिळताच धामणगाव रेल्वे येथील तहसीलदार गोविंद वाकोडे यांनी आपल्या चमुसह घाटावर जाऊन कारवाई करत अवैध रित्या उपसा केलेली 30 ब्रॉस वाळू जप्त केली आहे.
चिंचोली आणि विटाळा घाटावर कारवाईची मागणी – तहसीलदार यांनी गोकुलसरा घाटावर जाऊन जी धडक कारवाई केली आहे ती प्रशंसनीय आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे. अशीच कारवाई चिंचोली घाटावर सुद्धा करण्यात आली होती.पण 3- 4 दिवस उपसा बंद राहिल्या नंतर तो पुन्हा सुरू करण्यात आला आहे. तसेच विटाळा आणि वकनाथ येथून देखील वाळूचा अवैध उपसा सुरू असल्याचे बोलल्या जात आहे.त्यामुळे या ठिकाणी देखील वाकोडे साहेबांनी कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे .
चोरी होत असलेल्या ठिकाणच्या तलाठी आणि कोतवाल यांना निलंबित करण्याची मागणी – तालुक्यातील प्रत्येक हलक्यात तलाठी आणि कोतवालाची नियुक्ती केली आहे. महसूल विभागाशी संबंधित प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही कोतवाल आणि तलाठी यांची आहे. असे असताना देखील घाटातून अवैध वाळू उपसा होत असेल तर तो रोखण्याची अथवा त्याबद्दल वरिष्ठांना काळविण्याची जबाबदारी ही त्यांची असते. त्यांनी वरिष्ठांना कळविले नसल्यास त्यांच्यावर आणि कळविले असल्यास वरिष्ठांवर कारवाई होने अगत्याचे आहे.
त्याच घाटावर बाजूला सुरू असलेल्या गैरकायदेशीर उपस्यावर कारवाई का नाही ? –  ज्या घाटावर जाऊन तहसीलदार यांनी कारवाई केली आहे. त्याच घाटाच्या बाजूला शासनाने डेपो चालकांना वाळू उपस्याची परवानगी दिली आहे. शासनाच्या नियमात जेसीपी किंवा पोकलँड ने उपसा करणे गैरकायदेशीर असतांना देखील डेपो चालक जेसीबी ने उपसा करत आहे. त्यामुळे हीच कर्तव्यदक्षता डेपो चालकांवर दाखवणे आवश्यज होते असे बुद्धिजीवी लोकांचे मत आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close