संपूर्ण शाळांमध्ये आजपासून शिक्षण सप्ताह सुरू

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना मिळणार चालना
उपक्रमाचे फोटो अपलोड करावे लागणार
प्रतिनिधी…… आर्वी
राष्ट्रीय शिक्षण धोरण२०२०च्या दिनानिमित्त आज२२जुलै ते२८जुलै या साप्ताहिक कालावधीत सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळामध्ये या नेमुन दिलेल्या कालावधीत विविध प्रेरणादायी व नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येण्यार आहेत. अशी माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहेत.
..भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने देशात “शिक्षण व साक्षरता “सप्ताह अभियान राबविण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत. या सप्ताहात प्रत्येक दिवस विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित केला असून, त्यात शिक्षण व शारीरिक, मानसिक, भावनिक विकासाच्या दुष्टिने विविध पैलूंचा समावेश केला आहे..
वस्तुतः हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ व भागधारकांमध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहेत. याबाबतची माहिती गटशिक्षणाधिकारी,शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांना दिल्याचे प्राथमिक. व माध्यमिक. शिक्षणाधिकारी यांनी सांगितले आहे…
याशिवाय रोज झालेल्या शैक्षणिक उपक्रमाची छायाचित्रे, व्हिडीओ, अहवाल माहिती, एनपीसपी यांनी उपलब्ध करून दिलेल्या ट्रकरवर अपलोड करण्यात येणार आहेत. त्यामुळे पालक व शिक्षण विभागाने या उपक्रमाचे स्वागत केले आहेत.
प्रत्येक दिवशी शाळांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून पाणी कसे वाचवायचे आणि वास्तविक जीवनात इतरांना मदत कशी करावी, या सारख्या गोष्टी विद्यार्थ्यांना सदर उपक्रमातुन शिकायला मिळणार आहेत, त्यामुळे हा विद्यार्थ्यांना नवचैतन्य देणारा उपक्रम आम्ही आमच्या शाळेत हिरिरीने राबवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुप्त गुणांना चालना देवू.
*उमेशभाऊ आसटकर*
मु.अ जि.प. प्रा.शाळा जळगाव
या शिक्षण सप्ताह च्या माध्यमातून आमच्या शाळेत मैदानी, शारीरिक व डिजिटल स्वरुपाचे विविध कौशल्य दायी खेळ, बोर्ड, गेम्स भिंतीवरील शैक्षणिक तक्ते, वाचन कट्टा आदी कार्यक्रमाचे आम्ही आमच्या शाळेत करणार असून, विद्यार्थ्यांच्या शारीरिक, भावनिक, मानसिक आणि वैद्यानिक दुष्टीकोनातुन प्रोत्साहन देणार आहोत.
*रवी गोहत्रे*
पदवीधर शिक्षक
जि.प.उच्च प्रा.शाळा शिरपूर.
सात दिवसाचे कार्यक्रम
(१)२२जुलै अध्ययन-अध्यापन साहित्य दिवस
(२)२३जुलै मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस
(३)२४जुलै .क्रीडा दिवस
(४)२५जुलै सांस्कृतिक दिवस
(५)२६जुलै कौशल्य व डिजिटल,उपक्रम दिवस
(६)२७जुलै इको क्लब मिशन लाईफ(ईको क्लब उपक्रम)व शालेय पोषण दिवस
(७)२८जुलै समुदाय सहभाग दिवास