शिक्षकांनी सुरु केली विद्यार्थ्यांची शोधमोहीम
शिक्षकांच्या ऊन्हाळी सुट्या आता विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी
आर्वी.-प्रतिनिधी
राज्य शासनाच्या ५मार्च २०२४च्या सुधारित जीआर नुसार प्राथमिक व माध्यमिक शाळासाठी संचमान्यतेचे नवीन निकष लागू करण्यात आले आहेत…. हे निकष चालू सत्र-२०२४-२५या शैक्षणिक वर्षांपासून अंमलात येणार आहेत. त्यामुळे बहुतांश शाळामध्ये शिक्षकांची संख्या कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहेत.
या निर्णयाने बहुतांश शिक्षकांचे टेन्शन वाढल्याचे दिसून येत आहे. संच मान्यता टिकवण्यासाठी शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत असुन ,विद्यार्थी मिळवण्यासाठी अनेक शिक्षकांनी गावागावांत विद्यार्थी शोधमोहीम राबविल्याचे दिसून येत आहेत. भर ऊन्हातान्हात आता शिक्षक विद्यार्थी शोधमोहीम राबवित असून, अनेक शिक्षकांची उन्हामुळे त्रेधातिरपीट उडत आहेत.
अलीकडे इंग्रजी माध्यमाच्या शहरी शाळेकडे विद्यार्थी व पालकांचा ओढा व कल वाढला आहे. अशातच मराठी शाळासाठी शासनाच्या संचमान्यतेच्या शासन निर्णयामधील बऱ्याच अटी, शर्थी जाचक ठरत आहे. या निकषांचा सर्वकष विचार केल्यास चालू सत्र-२०२४-२५ पासून शिक्षक संख्या मान्यतेचे प्रमाण कमी होण्याची दाट शक्यता शैक्षणिक वर्तुळात व्यक्त केली जात आहे. वस्तुतः ते संचमान्यतेचे प्रमाण टिकवणेदेखील शिक्षकांना अवघड होणार आहे. संचमान्यतेच्या नवीन निकषानुसार पटसंख्या वाढविण्यावर शिक्षकाकडून अधिक भर दिला जात आहे.
जिल्हा परिषद शाळासह अन्य अनुदानित शाळातही पटसंख्या आता रोडावली आहेत. शासनाच्या संचमान्यतेची संदर्भ तारीख:-३०सप्टेंबर पर्यंतची असणार आहे. व्दिशिक्षकी शाळामध्ये६०पटासाठी किमान दोन शिक्षक असणार आहेत, मात्र तिसऱ्या शिक्षकासाठी १६मुलांची अधिकची आवश्यकता असणार आहे. तीन शिक्षक टिकवण्यासाठी किमान७६पटसंख्या असणे आवश्यक आहे.२०पटसंख्येच्या शाळेमध्ये दोन शिक्षक असणार आहे. एक नियमित शिक्षक आणि दुसरा सेवानिवृत्त शिक्षक, अशी दोन पदे असणार आहेत. पटसंख्या दहापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असल्यास फक्त एक शिक्षक मान्य होणार आहे. विशेष म्हणजे तोही सेवानिवृत्त शिक्षकामधून नेमला जाणार आहे.
इयत्ता ६वी ते८वी मध्ये एकच वर्ग असल्यास ३५वर एक शिक्षक आणि त्यापुढे५३पटापर्यत दुसरा शिक्षक मान्य होणार आहे. तिसऱ्या शिक्षकासाठी किमान पटसंख्या लागणार आहे.
मुख्याध्यापकाच्या पदासाठी १५०पटसंख्या लागणार असुन इयत्ता ६वी ते८वीमध्ये दोन वर्ग असल्यास७०पटसंख्येपर्यत दोन शिक्षक आणि ८८पटसंख्येनंतरच तिसरा शिक्षक मान्य होणार आहेत. त्यामुळे ही संचमान्यतेची तथाकथित अट शासनाने रद्द करावी, अशी मागणी जोर धरत आहे…
शासनाच्या शिक्षण अधिनियम२००९नुसार प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणे आवश्यक आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्ता शिक्षण मिळण्यासाठी केवळ पटसंख्येचा आग्रह करणे चुकिचा आहे. आजही अनेक शाळा एकशिक्षकी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहेत. शिक्षक संख्या केवळ पटावरुन न ठरविता, वर्गाप्रमाणे ठरविली तर विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे काम शिक्षकासाठी सुलभ होईल व विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा वाढेल. म्हणून शिक्षण क्षेत्रात संचमान्यतेचे नियम शिथिल करण्यात येवून, शाळेच्या रिक्त जागी नवीन शिक्षकांची नियुक्ती करणे, आवश्यक बाब आहेत..
अविनाश ल टाके
शिक्षक आर्वीसंचमान्यतेच्या शासन निर्णयामधील बऱ्याच अटी व काही शर्थी शिक्षकासाठी जाचक ठरत आहेत, या अटीमुळे अनेक शिक्षक प्रभावित होवून अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे शासनाने ग्रामीण भागातील व शहरी भागातील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी हा संचमान्यतेचा जिआर रद्दबातल करून शिक्षकांना उचीत न्याय मिळवून द्यावा….
मंगेश कोल्हे
शिक्षक मित्र परिवार संघटक आर्वी जिल्हा. वर्धा
……………. .. …