शिक्षकांच्या मानसिक त्रासाला कंटाळून विध्यार्थ्याची आत्महत्या
शिक्षक राहुल वानखडेला अटक करा : – वंचीत बहुजन आघाडीची मागणी
अमरावती
प्रतिनिधी :- सतीश वानखडे
चांदूर बाजार तालुक्यातील शीरजगाव बंड येथील मृतक कार्तिकेश प्रविण मनोहरे वय वर्ष 13 या विद्यार्थ्यांला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्या चांदूर बाजार नगर परिषद विद्यालयातील शिक्षक राहुल दत्तात्रय वानखेडे यांच्यावर पोलीस प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून त्याला अटक करावी. या मागणीचे निवेदन चांदुर बाजार येथील एस. डी. ओ. साहेब यांना वंचीत बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून देण्यात आले आहे.*
सविस्तर तपशील निवेदनानुसार हा शिक्षक मृतक कार्तिकेश ला वारंवार मानसिक त्रास देऊन अपमानित करीत असल्याचे निवेदनाच्या माध्यमातून सांगण्यात आले. शिक्षकाकडून वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळून 8 व्या वर्गात शिकणार्या कार्तिकेशने आत्महत्या केली असल्याने अश्या नराधम शिक्षकांना जेरबंद करून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करावी. अन्यथा असे शिक्षक विद्यार्थ्यांसाठी खुप घातक आहे. असे नराधम शिक्षक शाळेत राहिल्यास कित्तेक निष्पाप विध्यार्थ्याचा बळी जाईल हे सांगणे कठीण आहे. या करिता पोलीस प्रशासनाने त्वरित कार्यवाही करून सदरच्या आरोपीला तात्काळ अटक करावी. या मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आले आहे. निवेदन देते वेळी सुरज चव्हाण ( वंचीत बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष चांदूर बाजार ) सिद्धार्थ भोजने सर (हितचिंतक व मार्गदर्शक)
सागर भवते युवा नेतृत्व ग्रा. पं. सदस्य, मयुरेश इंगळे (तालुकाध्यक्ष अमरावती)
तोशाल नव्हाले (महासचिव) बुद्धभूषण तागडे, (शिरजगाव बंड सर्कल प्रमुख) किरण वानखडे (शाखा अध्यक्ष सोनोरी) अविनाश वासनिक, (शाखा अध्यक्ष वणी) प्रविण मनोहरे, शरद खेरडे, विकास सदांशीव इत्यादि
वंचित बहुजन युवा आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.