क्राइम

सेक्सटॉर्शन चा बळी पडलेल्या शिक्षकाची कुटुंबासमोर झाली फजिती

Spread the love

नाशिक / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                  अनोळखी तरुणी किंवा महिलेकडून आपणाला फेसबुक वर कॉल येतो. सुंदर दिसणाऱ्या त्या तरुणी किंवा महिले बाबत अधिक जाणून घेण्याची उत्सुकता असल्याने तुम्ही तो कॉल उचलता. तुम्ही कॉल रिसिव्ह केल्यावर समोरची व्यक्ती तुमच्या सोबत गोडगोड बोलू लागते. तुम्ही तिच्या जाळ्यात पूर्णतः अडकले आहात हे पक्के झाल्यावर ती तुमच्याशी अश्लील संभाषण करू लागते. इतकेच नाही तर ती स्वतःचे कपडे काढू लागते. तुम्हाला देखील ती तसे करायला भाग पाडते. हे सगळे होत असताना तिच्या मोबाईल मध्ये स्क्रीन शूटिंग सुरू असते. बोलणे आटोपल्यावर ती रेकॉर्ड केलेला तो व्हिडीओ तुमच्या नंबर वर पाठवते आणि पैशाची मागणी करते. तसे न केल्यास ती पोलिसात जाण्याची धमकी देते. तिचा दोन कट होत नाही तोच तुमच्या मोबाईल वर क्राईम ब्रँच चा फोन येतो आणि सुरू होतो तुमच्या कडून पैशे उकळण्याचा प्रकार.असाच प्रकार एका शिक्षकासोबत झाला आहे.

घटना नाशिकमधील आहे. येथील एका शिक्षकाला सायबर भामट्याने सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवून लाखो रूपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, सायबर भामट्याने शिक्षकाच्या मुलाला अश्लिल व्हिडीओ पाठविले. त्याबाबत मुलाने वडिलांना विचारणा केली असता त्यांना धक्का बसला. याप्रकरणी शिक्षकाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळी सुटी सुरु झाल्याने नाशिक शहरातील एक शिक्षक घराजवळील झाडाखाली बसले होते. त्यावेळी ते फेसबुकवरील पोस्ट पाहत होते. दरम्यान, त्यांना अनोळखी क्रमांकावरून व्हिडीओ कॉल आला. व्हिडीओ कॉलमध्ये सुंदर तरुणीचा फोटो दिसत असल्याने त्यांनी कॉल रिसीव्ह केला. मात्र, हा कॉल त्यांना फसवणूक करण्यासाठी आलेला आहे, हे समजले नाही. तरुणीने शिक्षकाशी भावनिक बोलण्यास सुरुवात केले. तिचे बोलणे ऐकून ते प्रभावीत झाले. ही संधी साधत तरूणीने थेट न्यूड कॉल केला. तरीही शिक्षक तिच्याशी भावनिक बोलत होते. अनोळखी तरूणीने शिक्षकाला बोलण्यात गुंतवत पटकन व्हिडीओ डाऊनलोड करण्यासह स्क्रिनशॉट काढून घेतला.

अनोळखी तरुणीने शिक्षकाला कॉल करत पैशांची मागणी सुरु केली. तिचा सुरुवातीचा संवाद आणि आता थेट पैशांची मागणी ऐकून शिक्षकांना काय बोलावे आणि काय करावे, ते सुचत नव्हते. शिवाय, ही बाब कुटुंबियांनासुद्धा समजली. शेवटी, त्यांनी एका पोलीस मित्राला कॉल करत आपबिती सांगितले. पोलीस मित्राने त्यांना मार्गदर्शन करत पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितले. तोपर्यंत अनोळखी तरूणीचे वारंवार धमकीचे कॉल सुरु होते. शिक्षकाने सायबर पोलीस ठाण्यात येत आपबिती सांगितले. त्यानंतर पोलिसांनी शिक्षकाला आधार देत कारवाईचे आश्वासन दिले. तेंव्हा शिक्षक तणावमुक्त झाले. याप्रकरणी शिक्षकाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

व्हिडीओ पाहून मुलगा म्हणला, या वयात हे असले उद्योग

अनोळखी तरुणीने शिक्षकाचा अश्लिल व्हिडीओ मुलाला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला. तो व्हिडीओ पाहून मुलाला धक्काच बसला. तो वडिलांना व्हिडीओ दाखवत म्हणाला की, या वयात हे असले उद्योग कशाला करता. मुलाचे बोलणे ऐकून आणि अश्लिल व्हिडीओ असल्याचे समजताच ते अस्वस्थ झाले. तितक्यात त्यांना अनोळखी तरूणीने कॉल करत पैशांची मागणी केली. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सुरु झाला.

जाळ्यात अडकण्यासाठी अशी केली जाते फसवणूक

अनोळखी व्यक्तीला पहिलं पेमेंट करण्यापूर्वीच पोलिसांची मदत घ्या. खर्‍या महिलेचा फक्त फोटो टार्गेटला दाखवलेला असतो. व्हिडिओ कॉलमध्ये टार्गेटचा फ्रंट कॅमेरा आणि महिलेचा रिअर कॅमेरा चालू असतो. महिला स्वतः नग्न होत नसते तर रिअर कॅमेरा चालू आहे दाखवून पॉर्न व्हिडिओ चालवले जातात. पण यात टार्गेटचा फ्रंट कॅमेरा चालू असल्याने अडकवले जाते.

काय आहे सेक्स्टॉर्शन

सुरुवातीला फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली जाते. सायबर भामट्यांनी तरुणींना अश्लिल बोलायला तयार केलेले असते. अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन हा व्हिडिओ कॉल केला जातो. ओळख होताच तरुणी नग्न होऊन व्हिडिओ कॉल करते. समोरच्या व्यक्तीलाही कपडे काढायला लावते. बोलण्यात गुंतवून रेकॉर्डिंग केले जाते. त्यांतर खंडणी मागण्यास सुरुवात होते. खंडणीची रक्कम बनावट खात्यात मागवली जाते. पहिले पेमेंट ही फक्त सुरूवात असते. पैसे दिल्यानंतर वारंवार खंडणीची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. व्हॉईस मॉड्युलेशनचा वापर करुनही खंडणी मागितली जाते. हे रॅकेट दिवसेंदिवस वाढत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close