हटके

भावी वधूने लग्नाआधीच नवऱ्या समोर ठेवली अशी अट की …….

Spread the love

बीजिंग / नवप्रहार डेस्क

                  लग्न ठरल्यावर अनेक कपल आपल्या भावी आयुष्याला घेऊन अनेक स्वप्न रंगवीत असतात. त्यात हनिमून साजरा करण्यापासून तर अपत्य प्राप्ती साठी प्लॅनिंग करीत असतात. लग्न ठरल्यावर लग्नापूर्वीच जर बायकोने भावी नवऱ्याकडे काही अनपेक्षित अपेक्षा ठेवल्या तर नवऱ्याची गोची होते. या प्रकरणात सुद्धा भावी बायकोने नवऱ्या समोर अशी मागणी ठेवली की त्याने त्यास नकार दिला आणि त्याच कारणाने भावी वधूने लग्न मोडले. विशेष बाब म्हणजे हे कपल लग्नापूर्वी चार वर्षांपासून लिव्ह इन मध्ये राहत होते.

चीनमधील हे प्रकरण आहे. झेजियांग प्रांतातील एका व्यक्तीने सोशल मीडियावर आपली स्टोरी शेअर केली आहे. त्याने आपल्या होणाऱ्या पत्नीने लग्नाआधी केलेल्या मागणीला नकार दिल्याने तिने काय केलं ते त्याने सांगितलं. साऊथ चाइना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार शियाओली असं या व्यक्तीचं नाव आहे.

त्याचं त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न ठरलं होतं. पण लग्नाआधी तिने असं काही मागितलं, ज्यामुळे तो हैराण झाला.  त्याने सांगितलं, ते दोघं चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचं लग्न होणार होतं पण एक दिवस तिने त्याच्याकडे भलतीच मागणी केली.

त्याला नोकरीतून जो वार्षिक बोनस मिळत होता, तो लग्नानंतर तिला द्यायचा असं ती म्हणाली. होणाऱ्या बायकोची लग्नाआधीच ही मागणी ऐकून तोसुद्धा हैराण झाला. त्याने तिला आणि तिच्या पालकांना समजवण्याचा प्रयत्न केला. आपला पगार जास्त नाही त्यामुळे आयुष्यभरासाठी आपण आपल्या वार्षिक बोनसवरच अवलंबून आहोत.

जर सर्व बोनस त्याने तिला दिला तर त्याला त्याच्या लाइफस्टाईलमध्ये खूप बदल करावा लागला. हे त्याने सांगितलं. पण कुणीच त्याचं ऐकायला तयार नाही. हेच त्यांचं नातं तुटण्याचं सर्वात मोठं कारण ठरलं.

महिलेने सांगितलं जर त्याने तिला पैसे दिले नाही तर ती त्याच्यावर प्रेम करणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं. यानंतर त्यांच्यात वाद झाले आणि महिलेने ठरलेलं लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. तिच्या आईवडिलांनी शियाओलीला फोनवरून त्यांच्या मुलीला हे लग्न करायचं नसल्याचं सांगितलं.  यानंतरही शिआओलीला आणखी एक मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा त्याला समजलं की त्याची गर्लफ्रेंड त्याच्याशी ठरलेलं लग्न मोडून तिच्या तिच्या एक्स-बॉयफ्रेंडशी लग्न करत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close