ब्रेकिंग न्यूज
घरासमोर उभ्या असलेल्या महिलांना आणि लहान मुलांना कार ने उडवले

वृद्ध महिलेचा मृत्यू ,जखमींवर रुग्णालयात उपचार
जळगाव / नवप्रहार डेस्क
जळगाव शहारातून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. येथील मेहरून परिसरातील मंगलपुरी गल्लीत घरासमोर उभ्या असलेल्या पाच महिलांना आणि दोन बालकांना कार ने जबरदस्त धडक दिल्याने 5 महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यापैकी एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर जखमी 4 महिला आणि बालकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यानंतर स्थानिकांनी कार चालकाला चांगलाच चोप दिला.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1