अपघात
देवगाव – पुलगाव रोड वर टाटा ace आणि दुचाकित भीषण अपघात

एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
धामणगाव रेल्वे – देवगाव रोडवर टाटा एस आणि दुचाकी मध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे तर एक गंभीर जखमी आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार जळका पट येथील रहिवासी शंकर भास्करराव वानखेडे (५२) आणि भीमराव परतीके हे आपल्या दुचाकी वाहनाने पुलगाव वरून देवगाव कडे येत असताना रायपूर कासारखेड च्या जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या टाटा ace वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकी वर असलेल्या शंकर भास्करराव वानखेडे यांचा मृत्यू झाला आहे तर भीमराव परतिके गंभीर जखमी झाले आहेत. भीमराव परतिके यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1